पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाचा आज निकाल लागला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर मुंबईत कोर्टात उपस्थितीत आहे. तब्बल 20 वर्षाच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर आज या खटल्याचा निकाल लागला आहे. यामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे.
पद्सिंह पाटील, लातूर येथील बिझनेसमन सतीश मंदादे, निवृत्त राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक मोहन शुक्ला आणि हल्लेखोर हे या प्रकरणात आरोपी होते. 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर मुंबईहून धाराशिवच्या दिशेने प्रवास करत होते. कळंबोली परिसरात त्यांच्या वाहनाला अडवून काही हल्लेखोरांनी अचानक गोळीबार केला. या हल्ल्यात पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे वाहनचालक समद काझी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.