Sayaji Shinde: ‘दादांचं स्वप्न पूर्ण व्हावं…’ सयाजी शिंदेंनी घेतली सुनेत्रा पवार आणि शरद पवारांची भेट ; विलीनीकरणावर नेमकी काय चर्चा झाली?

अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Sayaji Shinde: ‘दादांचं स्वप्न पूर्ण व्हावं…’ सयाजी शिंदेंनी घेतली सुनेत्रा पवार आणि शरद पवारांची भेट ; विलीनीकरणावर नेमकी काय चर्चा झाली?

Sayaji Shinde: 'अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी केवळ भावनिक नसून राजकीयदृष्ट्याही मोठी आहे. त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्येच नव्हे, तर संपूर्ण राज्यात अस्वस्थता पसरलेली दिसते. अशा पार्श्वभूमीवर अभिनेते सयाजी शिंदे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र यावं, अशी भूमिका मांडत नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. हा निर्णय जरी राजकीय स्थैर्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असला, तरी अजित पवार यांच्या नेतृत्वाची उणीव भरून निघणं सहज शक्य नाही, अशी भावना अनेक नेते आणि कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सयाजी शिंदे यांनी सुनेत्रा पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटींनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत, महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र येण्याची गरज अधोरेखित केली.

हेही वाचा: Baramati Voting For ZP: अजित पवारांच्या निधनानंतर बारामती सुन्न, मतदारांची जिल्हा परिषद निवडणुकीकडे पाठ, पुणे जिल्ह्यात सर्वात कमी मतदानाची नोंद

सयाजी शिंदे म्हणाले की, अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्र जणू निःशब्द झाला आहे. अशा दुःखाच्या क्षणी शब्दही अपुरे वाटतात. मात्र, पुढील वाटचाल कशी असावी, याचा विचार करणं गरजेचं आहे. त्यांच्या मते, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही प्रवाह एकत्र आले, तरच अजित पवार यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं आणि राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळू शकते. निवडणुकांच्या काळात विलीनीकरणाबाबत चर्चा झाली होती, केवळ औपचारिकता बाकी होती, असंही त्यांनी सूचित केलं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी येत्या काही दिवसांत पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाचा खुलासा करणार असल्याचं जाहीर केलं आहे. यामुळे विलीनीकरणाबाबतच्या चर्चांना अधिक वेग आला आहे. दुसरीकडे, काही नेत्यांनी पक्षांतर्गत संवाद सुरू असल्याचे संकेत दिले आहेत. नेतृत्वाने जबाबदारीने पुढाकार घेतला, तर त्याला विरोध का व्हावा, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा: Sanjay Raut: "हिंदू मंदिरांवर हल्ले करण्यासाठी दान…?", मुंबई महापौर निवडीनंतर राऊतांचे मुख्यमंत्र्यांना खडे सवाल

राजकीय विश्लेषकांच्या मते, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने घेतलेले अनेक निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारे ठरले. त्यांची निर्णयक्षमता आणि धाडसी भूमिका पुन्हा एकत्रित ताकदीतून पुढे यावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळेच विलीनीकरणाचा मुद्दा आता केवळ चर्चेपुरता न राहता, प्रत्यक्ष कृतीकडे वळतो का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सध्याच्या परिस्थितीत दुःख व्यक्त करणं स्वाभाविक असलं, तरी राज्याच्या राजकीय स्थैर्यासाठी आणि विकासासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. येणारे दिवस या दृष्टीने निर्णायक ठरतील, असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number