Uddhav Thackeray on Freedom of Religion Bill :’विधेयकाला आमचा पाठिंबा…’, उद्धव ठाकरेंनी धर्मांतराच्या मुद्द्यावर दिली प्रतिक्रिया

हे विधेयक सर्व धर्मांना लागू आहे, असं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Uddhav Thackeray on Freedom of Religion Bill :’विधेयकाला आमचा पाठिंबा…’, उद्धव ठाकरेंनी धर्मांतराच्या मुद्द्यावर दिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडलं आहे.  हे विधेयक नेमकं काय आहे? या विधेयकांतर्गत नेमक्या काय तरतुदी आहेत? याबाबत यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.  हे विधेयक कुठल्याही एका धर्मासाठी किंवा धर्माविरुद्ध नाही. हे विधेयक सर्व धर्मांना लागू आहे, असं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

बेकायदेशीर धर्मांतर करून लग्न होतात.  त्यानंतर काय करायचे याबाबत न्यायालयाने वेळोवेळी निर्णय दिले आहेत.  त्यानुसार तरतूद केली आहे, बेकायदेशीर धर्मांतराद्वारे केलेला विवाह रद्द घोषित केला जाईल. यावर आता उद्धव ठाकरे यांनी या विधेयकाला पाठिंबा दर्शवला आहे. 

हेही वाचा – Eknath Shinde : एकनाथ शिंदेची नाराजी? तडकाफडकी दिल्लीला रवाना, अमित शाहांची घेणार भेट

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की,  “धर्मांतराबद्दलच जे विधेयक आहे, ते विधानसभेत मांडलं गेलं आहे. उद्या ते विधान परिषदेमध्ये मांडलं जाईल. त्या विधेयकाचा मसुदा मी पाहिला. धर्म स्वातंत्र्य हे प्रत्येकाला असलंच पाहिजे, कोणीही जोर जबरदस्तीने किंवा कोणच्या असाह्यतेचा फायदा घेऊन, आमिष दाखवून धर्मांतर करता कामा नये. जर असं होत असेल तर त्याला आमचा विरोध आहेच. म्हणून या धर्मांतर विरोधी विधेयकाला आमचा पाठिंबा आहे”. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number