Ajit Pawar Land Case: मोठी बातमी! अजित आणि पार्थ पवार यांच्या समोरील अडचणीत वाढ; मुख्यमंत्री म्हणाले “अनियमितता आढळली तर होणार कारवाई "

या घडामोडीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं वादळ उठलं आहे. विरोधक अजित पवारांचा राजीनामा मागत आहेत, तर सरकारने सखोल चौकशीचा संकेत दिला आहे.

Ajit Pawar Land Case: मोठी बातमी! अजित आणि पार्थ पवार यांच्या समोरील अडचणीत वाढ; मुख्यमंत्री म्हणाले “अनियमितता आढळली तर होणार कारवाई &quot

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवं आणि गंभीर प्रकरण पुढे आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात तब्बल 1800 कोटींच्या बाजारमूल्याची जमीन केवळ 300 कोटींना खरेदी केली, तसेच या व्यवहारासाठी स्टॅम्प ड्युटी फक्त 500 रुपयेच भरली असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. दानवे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले होते की, “मेवाभाऊंच्या राज्यात 1800 कोटींची जमीन 300 कोटींत खरेदी, स्टॅम्प ड्युटी अवघे 500 रुपये! एक लाख भांडवल असलेल्या कंपनीला एवढा मोठा व्यवहार कसा शक्य झाला?”

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकरणावर सरकारला प्रश्न विचारले आहेत. त्या म्हणाल्या, “ही केस एकनाथ खडसेंसारखीच नाही का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता उपमुख्यमंत्र्यावर कारवाई करणार का?”

हेही वाचा: राहुल गांधींनी दाखवलेल्या ब्राझिलियन मॉडेलचा व्हिडिओ व्हायरल; म्हणाली, 'काय वेडेपणा आहे'

या सर्व आरोपांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की, “या प्रकरणाची संपूर्ण माहिती मी महसूल विभाग, आयजीआर आणि लँड रेकॉर्डसकडून मागवली आहे. चौकशीचे आदेश दिलेले आहेत. प्राथमिक दृष्ट्या काही मुद्दे गंभीर वाटतात. माहिती पूर्ण आल्यानंतर पुढील कारवाई होईल.” भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत विचारल्यावर फडणवीस म्हणाले, “उपमुख्यमंत्री अशा कुठल्याही प्रकाराला पाठिंबा देतील असं मला वाटत नाही. पण जर अनियमितता आढळली, तर सरकार कठोर कारवाई करेल.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची प्रतिक्रिया समोर येणं महत्त्वाचं होतं आणि अखेर फडणीसांनी या प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं आहे. या सगळ्या घडामोडींवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. अजित पवार यावर नेमकं काय विधान करतायत हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं वादळ उठलं आहे. एकीकडे विरोधक अजित पवारांची चौकशी आणि राजीनाम्याची मागणी करत आहेत, तर सरकारनेही या प्रकरणात सखोल चौकशी करण्याचे संकेत दिले आहेत.

हेही वाचा: Sanjay Raut Health Update : हात लिहिता राहिला पाहिजे… थेट रुग्णालयातून संजय राऊत यांचं ट्विट

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number