Dhananjay Munde: ‘राज्यातील मोठमोठे नेते मला संपवायला निघाले होते…’; धनंजय मुंडेंचा मोठा गौप्यस्फोट

मुंडेंच्या या विधानाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आता 'ते' बडे नेते कोण? या चर्चेला उधाण आले असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.<br/>

Dhananjay Munde: ‘राज्यातील मोठमोठे नेते मला संपवायला निघाले होते…’; धनंजय मुंडेंचा मोठा गौप्यस्फोट

Dhananjay Munde: ‘राज्यातील दिग्गज नेते मला राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी एकवटले होते, पण परळीच्या जनता त्यांना पुरून उरली,’ अशा कडक शब्दांत राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. परळी येथे आयोजित ‘प्रधानमंत्री आवास योजना’ अंतर्गत घरकुलांच्या धनादेश वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. मुंडेंच्या या विधानाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आता ‘ते’ बडे नेते कोण? या चर्चेला उधाण आले असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

बदनामीचे चक्र आणि परळीच्या जनतेचा ऐतिहासिक कौल
नगरपालिका निवडणुकांच्या काळातील आठवणींना उजाळा देताना धनंजय मुंडे भावूक झाले होते. ते म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकीचे वातावरण असताना काही बडे नेते मात्र केवळ धनंजय मुंडे यांना बदनाम कसे करता येईल, यातच मग्न होते. सोशल मीडिया, टीव्ही आणि वृत्तपत्रांमधून माझ्याविरोधात जाणीवपूर्वक चुकीचे वातावरण निर्माण केले गेले. मात्र, एवढी मोठी तटबंदी विरोधात असतानाही परळीच्या मायबाप जनतेने महायुतीवर विश्वास दाखवला आणि ऐतिहासिक विजय मिळवून दिला, असे म्हणत त्यांनी मतदारांचे जाहीर आभार मानले.

नगरसेवकांची कानउघाडणी
यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांना संबोधित करताना मुंडे यांनी कडक इशारा दिला आहे. “ज्यांनी मतदान केले त्यांचीच कामे करायची आणि इतरांकडे दुर्लक्ष करायचे, असा भेदभाव माझ्याकडे चालणार नाही. जर तक्रार आली, तर तुमची खैर नाही,” अशा शब्दांत त्यांनी नगरसेवकांना सुनावले. तसेच, “जे नगरसेवक स्वतःच्या जिवावर निवडून आलो असे समजत असतील, त्यांनी तो गैरसमज काढून टाकावा. तुम्हाला निवडून आणण्यासाठी मी काय प्रयत्न केले, हे मला ठाऊक आहे,” असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा – Raju Shetti : “…तर मुंबई – गोवा महामार्ग रोखणार”, राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा; कारण काय?

घरकुलांचे स्वप्न होणार पूर्ण
या कार्यक्रमात मुंडेंनी परळीच्या विकासकामांचा आढावा घेतला. आतापर्यंत 3000 घरकुलांचे वाटप झाले असून, यावर्षी एकूण 1500 घरकुलांचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. गरिबांच्या घरावरील पत्रे जाऊन आता तिथे पक्के सिमेंटचे छत येणार आहे. एकही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही, याची ग्वाही देत त्यांनी परळीच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार व्यक्त केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number