TMC Congress Merger: राष्ट्रीय राजकारणात मोठा भूकंप; काँग्रेसमध्ये TMC विलीनीकरणाच्या हालचाली सुरू? सोनिया गांधींचा ममता बॅनर्जींना फोन

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी थेट ममता बॅनर्जी यांना दूरध्वनी करून विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला होता, ज्यावर बॅनर्जी यांनी सकारात्मक कल दर्शवला आहे.

TMC Congress Merger: राष्ट्रीय राजकारणात मोठा भूकंप; काँग्रेसमध्ये TMC विलीनीकरणाच्या हालचाली सुरू? सोनिया गांधींचा ममता बॅनर्जींना फोन

TMC Congress Merger:  तृणमूल काँग्रेस (TMC) आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांच्या विलीनीकरणाच्या हालचालींनी आता वेग घेतला आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी थेट ममता बॅनर्जी यांना दूरध्वनी करून विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला होता, ज्यावर बॅनर्जी यांनी सकारात्मक कल दर्शवला आहे. मात्र, या प्रस्तावाला मंजुरी देतानाच ममता बॅनर्जी यांनी आपले पुतणे आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यामार्फत राहुल गांधी यांच्याकडे काही महत्त्वपूर्ण अटी आणि मागण्यांचे संकेत दिले आहेत.

सोनिया गांधींची 'ऑफर' आणि भाजपच्या कारवाईचा इशारा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांनी स्वतः ममता बॅनर्जी यांच्याशी संवाद साधत त्यांना काँग्रेसच्या 'राष्ट्रीय उपाध्यक्ष' पदाची जबाबदारी स्वीकारण्याची गळ घातली. यासोबतच अभिषेक बॅनर्जी यांना काँग्रेसचे 'सरचिटणीस' पद देण्याची तयारीही दर्शवली. भारतीय जनता पक्षाकडून (BJP) तृणमूल काँग्रेसवर होणारे राजकीय हल्ले आणि तपास यंत्रणांचा दबाव पाहता, हा विलीनीकरणाचा पर्याय उत्तम ठरेल, असा सल्ला काँग्रेसकडून देण्यात आला. तसेच 'आम आदमी पार्टी'प्रमाणे होणारा संभाव्य त्रास टाळण्यासाठी आणि पक्षांतर्गत असंतोषाला तोंड देण्यासाठी हे विलीनीकरण फायद्याचे ठरेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. या संवेदनशील विषयावर अंतिम निर्णय घेण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस नेतृत्वाकडे काही दिवसांचा वेळ मागितला आहे.

हेही वाचा – PM Narendra Modi: पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीची 12 वर्षे पूर्ण; सरकारच्या कामगिरीचा आढावा

अभिषेक बॅनर्जींच्या अटी; राहुल गांधींसमोर ठेवला प्रस्ताव
या राजकीय घडामोडींदरम्यान, अभिषेक बॅनर्जी आणि राहुल गांधी यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत टीएमसी नेत्याने ममता बॅनर्जी यांच्या पुनर्वसनाबाबत मोठी मागणी केली. विलीनीकरणानंतर ममता बॅनर्जी यांना राज्यसभेवर पाठवण्यात यावे आणि वरिष्ठ सभागृहात त्यांना थेट 'विरोधी पक्षनेते' पद बहाल करण्यात यावे, अशी अट टीएमसीकडून ठेवण्यात आली आहे. ममता बॅनर्जी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला संसदेत मोठी भूमिका मिळावी, असा यामागचा हेतू आहे. मात्र, तृणमूल काँग्रेसच्या या अटींवर काँग्रेस हायकमांडने अद्याप आपले पत्ते उघड केलेले नाहीत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number