देशाच्या राजधानीत सुरू असलेल्या आंदोलनाला आता वेगळे वळण आले आहे. आधी CJP प्रमुख अभिजीत दीपके, त्यांचे सहकारी, मुंबईतून तुषार गांधी आणि आता विरोधी पक्ष नेत्या ममता बॅनर्जी यांना अटक करण्यात आली आहे.
दिल्लीतील निवासस्थानाबाहेरून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सकाळपासून पोलिसांनी या आंदोलकांना अटक करण्याची जणू मालिकाच सुरू केली आहे. आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेतले जात असून, दिल्लीतील आंदोलन चांगलेच चिघळले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात असलेले हे आंदोलन आता कोणते नवीन वळण घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच सरकार त्यांच्या मागण्यांना काय प्रतिसाद देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा – CJP आंदोलनाचे मुंबईत पडसाद; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात