Manoj Jarange: इकडे जरांगेंची प्रकृती बिघडली अन् तिकडे सरकारच्या हालचालींना वेग; रात्री अडीच वाजता फोन अन्…; मोठी अपडेट समोर 

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा अकरावा दिवस मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवत चाललेली आहे. त्यामुळे रात्री साधारणता 2.30 वाजता मनोज जरांगे पाटील यांना औषधोपचार देण्यात आले आहेत.

Manoj Jarange: इकडे जरांगेंची प्रकृती बिघडली अन् तिकडे सरकारच्या हालचालींना वेग; रात्री अडीच वाजता फोन अन्…; मोठी अपडेट समोर 

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा अकरावा दिवस मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवत चाललेली आहे. त्यामुळे रात्री साधारणता 2.30 वाजता मनोज जरांगे पाटील यांना औषधोपचार देण्यात आले आहेत. मागील चार दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सलाईन पाणी आणि उपचार घेणे ही बंद केलं होतं, त्यामुळे जरांगे यांचं वजन तब्बल 7 किलोने घटल्याची माहिती समोर आली आहे. यादरम्यान रात्री अडीच वाजता तपासणी केल्यानंतर प्रकृती अधिक खालावल्याची माहिती मंत्र्यांना देण्यात आली. ही मिळताच मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी फोन करून सकाळपासून कार्यवाही सुरू करतो असे आश्वासन दिल्यानंतर सलाईन घेतले‌. सगळ्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण न सोडण्याची भूमिका त्यांनी पुन्हा जाहीर केले. 

हेही वाचा- Beed News : शेतकऱ्यांनी आंदोलनाकडे फिरवली पाठ, अवघ्या 15 मिनिटांत आंदोलन गुंडाळलं; शिवसेना जिल्हाप्रमुखांचा उबाठा नेत्यावर घणाघात

सरकारच्या हालचालींना वेग
तर दुसरीकडे जरांगे यांच्या मागण्यांवर काही महत्त्वाचे निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे समितीने गोळा केलेला सर्व अधिकृत डेटा आजच शासकीय वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाणार आहेत. तर तर, कुणबी प्रमाणपत्रांचे सुलभ वितरण व्हावे यासाठी येत्या 10 सप्टेंबरपासून ठिकठिकाणी विशेष शासकीय कॅम्प सुरू केले जाणार आहेत. तसेच शिंदे समितीने शोधून काढलेल्या मराठा-कुणबी नोंदी येत्या 7, 8 आणि 9 सप्टेंबर रोजी राज्यातील संबंधित ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये नागरिकांच्या माहितीसाठी लावल्या जाणार आहेत. त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

ऐन गणेशोत्सवात जरांगे यांचं मुंबईत आंदोलन?
अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 11 वा दिवस आहे. गेल्या 4 दिवसांपासून जरांगे यांनी पाणी, सलाईन बंद केल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे. दरम्यान जरांगे यांनी काल दुपारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबई आंदोलनाची तारीख 12 सप्टेंबर रोजी जाहीर करणार असल्याचं सांगत या बैठकीला राज्यभरातील मराठ्यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय. तर मुंबईत आझाद मैदानावर नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानीच आंदोलन करणार असल्याच म्हटलंय. दरम्यान ऐन गणेशोत्सवात जरांगे यांचं मुंबईत आंदोलन होणार असल्यानं सरकार त्याआधी जरांगे यांच्या उपोषणावर तोडगा काढतं की उपोषणाचा तिढा वाढणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number