Manoj Jarange Patil On CJP Protest : "सरकारचा माज उतरवण्यासाठी दिल्लीला जातोय" सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देत जरांगे दिल्लीला रवाना

नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय संघटनांनी आपली भूमिका स्पष्ट करत सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

Manoj Jarange Patil On CJP Protest : &quotसरकारचा माज उतरवण्यासाठी दिल्लीला जातोय&quot सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देत जरांगे दिल्लीला रवाना

नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय संघटनांनी आपली भूमिका स्पष्ट करत सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सीजेपीसह लाखो विद्यार्थ्यांनी सोमवारी संसद भवनाजवळ उभारलेल्या मोर्चात दिल्ली पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज करण्यात आला, यात अनेक विद्यार्थी गंभीररित्या जखमी देखील झाले होते.

जंतर-मंतरवर पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जवरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर कडक टीका केली आहे. तसेच आता विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण दिल्लीला जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. याचपार्श्वभूमिवर मराठा आरक्षक मनोज जरांगे पाटील सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. 

हेही वाचा- Uddhav Thackeray Met Abhijeet Dipke : ‘ही चिंगारी आता विझू देऊ नका, तुम्ही फक्त युवा नाही तर देशाचं भविष्य आहात’; उद्धव ठाकरेंनी वाढवलं आंदोलनकर्त्यांचं मनोबल

यावेळी त्यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया देत म्हटलं की, “विद्यार्थ्यांवर अत्याचार आणि क्रूर हल्ला केला, हे सर्व अति होतं मस्ती आलेली आहे. सरकारला माज मस्ती आलेली उतरवण्यासाठी मी जनतेच्या पाठीमागे उभे राहायला पाहिजे. त्यांना मुली विद्यार्थी देखील दिसली आहे, विद्यार्थी देशाचे भविष्य आहे मोदींना दयामाया यायला पाहिजे होती. काही मंत्र्यांकडून जाणून-बुजून हल्ला करायला लावला गेला पण पंतप्रधान या नात्याने देशाचे पालकत्व तुमच्याकडे असतं एवढ्या क्रूरपणे हल्ला होत असेल, तर ते सहन होत नाही. त्यामुळे ठामपणे नागरिकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.” 

“गोरगरिबांच्या लेकरांवर विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करून तुम्ही काय सिद्ध करणार आहे, हल्ले देखील तुम्हीच करायचे आणि गुन्हेदेखील तुम्हीच दाखल करायचे. ही भूमिका देशातील नागरिकांना पटण्यासारखी नाही. देशातील नागरिकांनी विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.”

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर पोलिसांनी परवा दिल्लीत लाठीहल्ला केला. पोलिसांच्या या कृतीवरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दुसरीकडे सरकारच्या भूमिकेवरून विरोधकांनी रान उठवले आहे. काल शरद पवार, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे यांनी उपोषणस्थळी धाव घेत आंदोलकांची विचारपूस केली. यानंतर आता मराठा आरक्षक मनोज जरांगे देखील नीट पेपरफुटीच्या आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number