Saturday, February 15, 2025 01:17:14 PM

Minister's Oath Ceremony to be held in Nagpur
नागपुरात होणार मंत्र्यांचा शपथविधी

नागपुरात होणार मंत्र्यांचा शपथविधी रविवारी दुपारी ३ वाजता मंत्रिमंडळ विस्तार विश्वसनीय सूत्रांची 'जय महाराष्ट्र'ला माहिती

नागपुरात होणार मंत्र्यांचा शपथविधी


मुंबई: विधानसभा निवडणुकांनंतर तीनही नेत्यांचा शपथविधी झाला मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली मात्र आता चर्चा रंगली होती उरवर्तीत नेत्यांचा शपथविधी सोहळा कधी पार पडणार ? आता या चर्चांच्या पार्श्वभूमीवर विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार असं समजण्यात येत आहे की, आगामी रविवारी नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. हा शपथविधी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आला आहे. राज्य सरकारमध्ये होणाऱ्या या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला राज्यभरात विशेष महत्त्व आहे.

नागपुरातील शपथविधीचा इतिहास
नागपूर शहर हे शपथविधींच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण ठिकाण मानले जात आहे. १९९१ मध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी नागपुरात झालेला शपथविधी विशेष लक्षात राहिलेला आहे. त्या वेळी, प्रदेश काँग्रेस पक्षातील काही नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती.
१९९१ मध्ये, भुजबळांसह सहा नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. या नेत्यांमध्ये डॉ. राजेंद्र गोडेंस, वसुधाताई देशमुख, भारत बाहेकर, शंकर नम, जयदत्त क्षीरसागर, आणि शालिनी बोरसे यांचा समावेश होता.

काँग्रेसमध्ये प्रवेश
तत्कालीन शपथविधीनंतर, शिवसेनेतून बाहेर पडून काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे भुजबळ हे विशेषतः चर्चेचा विषय ठरले. काँग्रेसमध्ये प्रवेश करताच, भुजबळांना मंत्रिपद देण्यात आले होते, आणि त्यांच्या या निर्णयाने त्यांचे राजकीय जीवन वेगळ्या वळणावर जात होते.

नागपुरात होणाऱ्या आगामी शपथविधीला इतिहासाची गोडी लागली असून, त्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे लवकरच राज्याच्या राजकारणात नव्या वळणांची सुरुवात होणार आहे. 
 


सम्बन्धित सामग्री