MPSC Students Meet Raj Thackeray: FIR का नोंदवला जात नाही? MPSC पेपरफुटीप्रकरणी मनसेचा आक्रमक सवाल

विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी या विषयात थेट हस्तक्षेप करण्याचे आश्वासन दिले आहे.

MPSC Students Meet Raj Thackeray: FIR का नोंदवला जात नाही? MPSC पेपरफुटीप्रकरणी मनसेचा आक्रमक सवाल

MPSC Stundents Meet Raj Thackeray: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) आयोजित औषध निरीक्षक (ड्रग इन्स्पेक्टर) पदभरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा गंभीर आरोप करत शेकडो बाधित विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या परीक्षेला 40 हजारांहून अधिक उमेदवार बसले होते, परंतु परीक्षेच्या अवघ्या 2 दिवस आधीच पेपर फुटल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. पुरेसे पुरावे देऊनही पोलिसांनी अद्याप एफआयआर (FIR) नोंदवला नसल्याने मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. शासन नेमके कोणाला पाठीशी घालत आहे आणि यात सत्ताधारी पक्षाशी संबंधित व्यक्तींचा हात आहे का, असा खळबळजनक सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘जेन झी’ (Gen Z) तरुणांशी संवादाच्या गप्पा मारण्यापेक्षा पेपरफुटीसारख्या ज्वलंत प्रश्नांवर ठोस कारवाई करावी, असा सडेतोड टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा – Ravikant Tupkar : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी होणाऱ्या मुंबईतील आंदोलनापूर्वी रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस; मात्र तुपकर आंदोलनावर ठाम, म्हणाले…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडणार प्रश्न
विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी या विषयात थेट हस्तक्षेप करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणातील सत्य बाहेर आणण्यासाठी आणि निष्पाप उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी राज ठाकरे स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. परीक्षा पद्धतीतील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत आणि दोषींवर एफआयआर नोंदवून चौकशी सुरू करावी, अशी मागणी मनसेने केली आहे.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मनसेचा पूर्ण पाठिंबा
इतर सामाजिक वा भाषिक मुद्द्यांवर भाष्य करणे टाळत मनसेने सध्यातरी पूर्ण लक्ष MPSC च्या प्रश्नावर केंद्रित केले आहे. मराठी तरुणांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मनसे कायम पाठीशी उभी राहिल, असा पुनरुच्चार संदीप देशपांडे यांनी केला. जर प्रशासनाने या संदर्भात तातडीने योग्य निर्णय घेतला नाही आणि विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा मार्ग निवडला, तर मनसे पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभी राहील, असा स्पष्ट इशारा पक्षाकडून देण्यात आला आहे. यामुळे या प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण मिळाले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number