एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गुन्हेगारीचा आलेख वाढला; अविनाश जाधवांचा खळबळजनक दावा, 9 ऑक्टोबरला थेट…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पोलीस प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गुन्हेगारीचा आलेख वाढला; अविनाश जाधवांचा खळबळजनक दावा, 9 ऑक्टोबरला थेट…
MNS Thane protest

ठाणे शहर आणि परिसरात वाढत्या गुन्हेगारीमुळे तसेच अमली पदार्थांच्या (ड्रग्स) उघड्याबोडक्या विक्रीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पोलीस प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बाळू पूर्णेकर प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी दावा केला की, गेल्या 6 महिन्यांत एकट्या ठाणे जिल्ह्यात तब्बल 49 हत्यांच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच गुन्हेगारांना पोलिसांचा कसलाही धाक उरलेला नाही, असा थेट आरोप करत ठाण्यातील गुन्हेगारीचा खरा सूत्रधार आणि ‘आक्का’ कोण, असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

अमली पदार्थांच्या तस्करीचा मुद्दा ऐरणीवर

बाळू पूर्णेकर यांच्या मृत्यूमागे मोठा कट रचला गेला असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला तातडीने अटक करून कठोर न्यायालयीन शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी मनसेने केली आहे. याशिवाय इंदिरानगर परिसरातील ड्रग्स सेवनाचा व्हिडिओ समोर आणत त्यांनी ठाण्यातील अमली पदार्थांच्या समस्येकडे लक्ष वेधले. तक्रारदारांना धमक्या दिल्या जात असून पोलीस कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचे त्यांनी सांगितले. माजीवडा नाक्यासारख्या गजबजलेल्या ठिकाणी पोलिसांच्या उपस्थितीतही गुन्हेगारी घडत असल्याबद्दल अविनाश जाधव यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! पुणे शिक्षक मतदारसंघावर भाजपकडून शिक्कामोर्तब; राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वाट्याला काय?

‘भयमुक्त ठाणे’साठी 9 ऑक्टोबरला महामोर्चा

ठाण्यातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था आणि वाढत्या गुन्हेगारीविरोधात 9 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4 वाजता सर्वपक्षीय महामोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. वकील संघटना, विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या मदतीने हा मोर्चा थेट ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे. या सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत नेत्यांनी इशारा दिला की, या मोर्चानंतरही जर शहरातील गुन्हेगारी आणि ड्रग्सचा सुळसुळाट थांबला नाही, तर पुढील टप्प्यात ठाण्यातील जबाबदार राजकीय नेत्यांच्या घरांवर थेट मोर्चा नेला जाईल.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number