पुणे: पुण्यातील शनिवारवाड्यात दोन दिवसांपूर्वी मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर भाजपाच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी असंख्य हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसह शनिवारवाड्यात प्रवेश केला. मुस्लिम महिलांनी ज्या ठिकाणी नमज पठण केले. ती जागा गोमूत्र शिंपडून आणि शेणाने सारवून ती जागा शुद्ध करण्यात आली. त्यानंतर शिववंदना देखील म्हणण्यात आली. यानंतर शनिवार वाड्यात नमाज पठण करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही असा इशारा खासदार मेधा कुलकर्णी यांनी दिला आहे.
हेही वाचा: Flood Relief Fund: केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी एवढ्या कोटींची आगाऊ रक्कम मंजूर
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, "आपला आधी असणारा हिंदू धर्म सोडून धर्मांतर केलं आहे. तुम्ही परत या अन्यथा तुम्हाला जर त्याच धर्मात राहायचं असेल तर तुमच्या किंवा मशिदीत जाऊन नमाज पठण करा. सार्वजनिक आणि आमच्या ऐतिहासिक ठिकाणी नमाज पठण सहन केले जाणार नाही. यापुढे अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाही. आता कायद्यामध्ये बदल झाला आहे."