Avinash Jadhav: ST बँकेत कोट्यवधींचा घोटाळा; अविनाश जाधवांनी थेट गुणरत्न सदावर्तेंविरोधात दाखवले पुरावे

अविनाश जाधव यांनी सदावर्ते यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना एका धक्कादायक व्हिडिओचा उल्लेख केला.

Avinash Jadhav: ST बँकेत कोट्यवधींचा घोटाळा; अविनाश जाधवांनी थेट गुणरत्न सदावर्तेंविरोधात दाखवले पुरावे

Avinash Jadhav: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (ST) बँकेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे. एसटी बँकेच्या 11 संचालकांनी नुकतीच अविनाश जाधव यांची भेट घेऊन त्यांच्याकडे भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे सुपूर्द केले आहेत. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जाधव यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गंभीर ताशेरे ओढले. “गरीब एसटी कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा पैसा कशाप्रकारे लाटला गेला आणि या घोटाळ्यात कोणाचे हात गुंतले आहेत, याचा संपूर्ण कच्चा चिठ्ठा आता समोर आला आहे,” असे जाधव यांनी नमूद केले.

“जीवे मारण्याच्या धमक्या आणि अर्वाच्य भाषा”; व्हिडिओ रेकॉर्डिंगचा पुरावा सादर
अविनाश जाधव यांनी सदावर्ते यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना एका धक्कादायक व्हिडिओचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, एसटी बँकेच्या बोर्ड मीटिंग सुरू असताना सदावर्ते एका महिला संचालकाशी अत्यंत अर्वाच्य भाषेत बोलत होते. “या व्हिडिओमध्ये सदावर्ते त्या महिलेला आणि इतर संचालकांना जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे, या धमक्या देताना ते वारंवार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाचा वापर करत होते,” असा दावा जाधव यांनी केला आहे. या सर्व घटनांचे चित्रीकरण असलेला पेनड्राईव्ह आता मनसेकडे उपलब्ध आहे.

मुख्यमंत्र्यांच्या नावाने दहशत? जाधवांचे सरकारला साकडे
सदावर्ते हे बँकेच्या संचालकांना आणि कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाचा धाक दाखवून गप्प करत असल्याचा आरोप जाधवांनी केला आहे. “सदावर्ते हे सतत मुख्यमंत्र्यांच्या नावाने धमकी देत आहेत, ही बाब गंभीर आहे. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, तुमच्या नावाचा वापर करून जर कोणी अशा प्रकारे लोकांची दिशाभूल आणि पिळवणूक करत असेल, तर त्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे,” असेही जाधव म्हणाले. अर्बन बँक विभागाच्या नियमांना हरताळ फासून हा कारभार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा – Raj Thackeray VS CM: मराठी न बोलणाऱ्या रिक्षावाल्यांवरून रंगलं शाब्दिक युद्ध; राज ठाकरेंना फडणवीसांनी दिलं सडेतोड उत्तर

एसटी कर्मचाऱ्यांच्या कष्टाच्या पैशावर डल्ला?
ज्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी सदावर्ते यांनी मोर्चा काढला आणि नेतृत्व केले, त्याच कर्मचाऱ्यांच्या पैशात आता तफावत दिसत असल्याचा मुद्दा मनसेने उपस्थित केला आहे. एसटी बँकेचा संपूर्ण काळा पांढरा व्यवहार या पुराव्यांमध्ये दडलेला असून, अर्बन बँक विभागाच्या कमिटीने केलेल्या चौकशीचे अहवालही आता समोर आले आहेत. “लढाई एसटी कर्मचाऱ्यांच्या भविष्याची आहे आणि आम्ही हा भ्रष्टाचार उघड केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,” असा इशारा अविनाश जाधव यांनी यावेळी दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number