Tuesday, November 18, 2025 04:22:41 AM

Maharashtra Local Body Election: नगरपालिका, नगर पंचायतीच्या निवडणुका लवकरच होणार, कधीपासून आचारसंहिता लागणार

निवडणुकीसाठीच्या इच्छुकांनी आपल्या उमेदवारीसाठी लॉबिंग करण्यासही सुरुवात केली. नगरपालिकांबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

maharashtra local body election नगरपालिका नगर पंचायतीच्या निवडणुका लवकरच होणार कधीपासून आचारसंहिता लागणार

मुंबई: महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच सुरू होणार असल्याची चर्चा आहे. काही वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका करण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केला होता. त्यानंतर सगळ्याच राजकीय पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली. तर, दुसरीकडे निवडणुकीसाठीच्या इच्छुकांनी आपल्या उमेदवारीसाठी लॉबिंग करण्यासही सुरुवात केली. नगरपालिकांबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याची मुदत राज्य निवडणूक आयोगाने वाढवली आहे. त्यानंतर राज्यात आधी नगरपालिका, नगर पंचायतीच्या निवडणुका पार पडतील अशी अटकळ बांधण्यात येत होती. आता या अनुषगाांने हालचाली सुरू झाल्याची माहिती पुढे येत आहे.

हेही वाचा: Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात अवतरले डोरेमॉन आणि नोबिता, नेमकं प्रकरण काय? वाचा सविस्तर

नगरपालिका निवडणूक कधी होणार?
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला आहे. नगरपालिकांच्या निवडणुकीची प्रक्रिया डिसेंबरमधील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी पूर्ण करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने यासाठी प्राथमिक आराखडा तयार केला आहे. हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिवेशनादरम्यान सरकारला कोणत्याही नवीन घोषणा करता येणार नाहीत, फक्त विधेयकांची मंजुरी इतकाच कार्यक्रम मर्यादित राहण्याची शक्यता आहे.

डिसेंबरअखेरपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पूर्ण करून त्यानंतर महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. नगरपालिका, नगरपंचायत निवडणूक ही विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आधीच होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा हा पहिला टप्पा असणार आहे. नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. जानेवारी 2026 अखेरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
 


सम्बन्धित सामग्री