लोकप्रतिनिधींच्या हाती जिल्ह्याची धुरा, पण ‘या’ कारणामुळे करता येणार नाही मतदान; पहा कोणत्या आमदाराला मतदानाला बंदी?

जिल्ह्याचे आणि राज्याचे नेतृत्व करणाऱ्या नागपूर विभागातील तब्बल 14 आमदार आणि 2 खासदारांना या पदवीधर निवडणुकीत स्वतःचे मत नोंदवता येणार नाही.

लोकप्रतिनिधींच्या हाती जिल्ह्याची धुरा, पण ‘या’ कारणामुळे करता येणार नाही मतदान; पहा कोणत्या आमदाराला मतदानाला बंदी?
voting ban

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची राजकीय रणधुमाळी सध्या जोरात सुरू असून, या निवडणुकीच्या निमित्ताने एक अत्यंत रंजक माहिती समोर आली आहे. जिल्ह्याचे आणि राज्याचे नेतृत्व करणाऱ्या नागपूर विभागातील तब्बल 14 आमदार आणि 2 खासदारांना या पदवीधर निवडणुकीत स्वतःचे मत नोंदवता येणार नाही. पदवीधर मतदारसंघाच्या नियमांनुसार, या निवडणुकीत मतदानाचा अधिकार प्राप्त करण्यासाठी संबंधित व्यक्ती किमान पदवीधर (Graduate) असणे बंधनकारक असते. मात्र, विभागातील 32 पैकी 14 आमदारांचे शिक्षण दहावी, बारावी किंवा कॉलेजच्या प्रथम-द्वितीय वर्षापर्यंतच मर्यादित असल्याने त्यांना मतदार यादीत स्थान मिळालेले नाही.

भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा समावेश

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे सर्व नेते पदवी पूर्ण नसल्यामुळे मतदानास अपात्र ठरले आहेत. केवळ विधानसभेचे आमदारच नव्हे, तर रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे आणि राज्यसभेच्या खासदार माया इवनाते यांनाही शैक्षणिक अर्हतेच्या अटीमुळे या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार नाही.

जिल्हानिहाय बिगर-पदवीधर लोकप्रतिनिधींची शैक्षणिक पार्श्वभूमी

नागपूर जिल्ह्यातून कृष्णा खोपडे (7 वी), चरणसिंह ठाकूर (12 वी), मोहन मते (ITI), प्रवीण दटके (Diploma 1st Year) आणि चंद्रशेखर बावनकुळे (B.Sc 1st Year) यांचा समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून विजय वडेट्टीवार (10 वी) व किशोर जोरगेवार (10 वी) तर भंडारा जिल्ह्यातून राजू कारेमोरे (12 वी) व नाना पटोले (B.A. 2nd Year) यांचा समावेश आहे.

हेही वाचा – महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचे अमित शाहांकडे साकडे, आता NDRF कडून…

गोंदिया जिल्ह्यातून विनोद अग्रवाल (12 वी) व संजय पुराम (12 वी); वर्धा जिल्ह्यातून समीर कुणावार (12 वी) व राजेश बकाने (B.A. 1st Year); तर गडचिरोली जिल्ह्यातून धर्मरावबाबा आत्राम (10 वी) हे मतदान करू शकणार नाहीत. खासदारांमध्ये माया इवनाते (5 वी) आणि श्यामकुमार बर्वे (B.A. 2nd Year) हे देखील पदवीधर नसल्याने मतदानाला मुकले आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number