Wednesday, July 09, 2025 09:14:46 PM

'नरेंद्र मोदी अमेरिकेपुढे सरेंडर का झाले?'; नाना पटोलेंचा भाजपला सवाल

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोलेंनी 'एक्स'वर पोस्ट करत भाजपवर टीका केली आहे. त्यासोबतच, 'नरेंद्र मोदी अमेरिकेपुढे सरेंडर का झाले?', असा सवाल नाना पटोलेंनी भाजपवर केला आहे.

नरेंद्र मोदी अमेरिकेपुढे सरेंडर का झाले नाना पटोलेंचा भाजपला सवाल

मुंबई: नुकताच, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोलेंनी 'एक्स'वर पोस्ट करत भाजपवर टीका केली आहे. नाना पटोलेंच्या 'एक्स' पोस्टची चर्चा सर्वत्र होत आहे. या पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांना टॅग करत नाना पाटोलेंनी भाजपवर टीका केली आहे. त्यासोबतच, 'नरेंद्र मोदी अमेरिकेपुढे सरेंडर का झाले?', असा सवाल नाना पटोलेंनी भाजपवर केला आहे. 

हेही वाचा: राज ठाकरे अन् फडणवीसांमधली भेट संपली; बैठकीचा तपशील गुलदस्त्यात

काय म्हणाले नाना पाटोले?

'ॲापरेशन सिंदूर हे भारतीय सैन्याच्या शौर्याचे प्रतिक आहे. आपल्या सैन्याने 30 मिनिटांत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे आणि पाकिस्तानचे लष्करी एअरबेस उद्धवस्त केले याचा माझ्यासह प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. भारतीय सैन्यदलाच्या शौर्याच्या आड लपून भाजप मात्र घाणेरडे राजकारण करत आहे. आघाडीवर असताना युद्धबंदी का केली ? या प्रश्नाचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देत नाही पण डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहे. आपण भारत आणि पाकिस्तानवर व्यापारासाठी दबाव टाकून युद्धबंदी केली हे ट्रम्प यांनी 12 वेळा म्हटले आहे. पंतप्रधानांनी आता तरी मौन सोडून यावर बोलावं', अशी टीका नाना पटोलेंनी भाजपवर केली आहे.

पुढे नाना म्हणाले की, 'नरेंद्र मोदींच्या 11 वर्षाच्या सत्ताकाळात भारताचे परराष्ट्र धोरणे हे कम्प्युटर गेम सारखेच राहिले आहे. पंतप्रधानांनी सत्तेवर आल्यापासून 100 च्या जवळपास देशांना भेटी दिल्या. पण यातला एक ही देश भारत पाकिस्तान संघर्षात उघडपणे भारताच्या बाजूने उभा राहिला नाही. हे गळेपडू परराष्ट्र धोरण फोटो व्हिडीओपुरतेच मर्यादित होते, याचा देशाला काहीच फायदा झाला नाही हे स्पष्ट आहे. भाजपाच्या लोकांनी आमच्यावर टीका करावी आम्हाला शिव्या द्याव्यात आमची काही हरकत नाही, पण त्यापूर्वी "नरेंद्र मोदी" अमेरिकेपुढे "सरेंडर" का झाले? याचे उत्तर द्यावे'.


सम्बन्धित सामग्री