Nana Patole Viral Video : "त्यांनी सांगितलं पाहिजे मी राजकारण सोडलं" नाना पटोलेंचा दूधाने पाय धुण्याचा व्हिडिओ व्हायरल; भाजप नेत्याचेी खळबळजनक प्रतिक्रिया

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये काही कार्यकर्ते नाना पटोले यांचे पाय दुधाने धुताना दिसत आहेत.

Nana Patole Viral Video : &quotत्यांनी सांगितलं पाहिजे मी राजकारण सोडलं&quot नाना पटोलेंचा दूधाने पाय धुण्याचा व्हिडिओ व्हायरल; भाजप नेत्याचेी खळबळजनक प्रतिक्रिया

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये काही कार्यकर्ते नाना पटोले यांचे पाय दुधाने धुताना दिसत आहेत. गुरुपौर्णिमेनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे. कार्यकर्त्यांनी आदर व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

हेही वाचा- Ganesh Naik : ‘माझ्या नादाला लागलात तर…’; गणेश नाईक यांचा आणि एकनाथ शिंदे यांना इशारा

यावर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, “काँग्रेस नेते नाना पटोले आपल्या कार्यकर्त्यांकडून पाद्यपूजन करून घेतात त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. नाना पटोले यांनी सांगितलं पाहिजे मी राजकारण सोडलं आहे आणि संन्यास घेतला आहे. साधुसंत यांचे पाद्यपूजन केले जाते त्याप्रमाणे नाना पटोले यांचं पाद्यपूजन कार्यकर्ते करत आहेत, दुधान अभिषेक घालत आहेत.”

“कुठल्याही कार्यकर्त्याने तो भाजपचा असू द्या किंवा काँग्रेसचा अशा पद्धतीने पाद्यपूजन करून घेण अतिशय चुकीच आहे. आपल्या कार्यकर्त्यांना गुलाम म्हणून घेण्याचं लक्षण आहे. नाना पटोले यांनी या प्रकरणात जाहीर माफी मागितली पाहिजे. आपण आपल्या कार्यकर्त्यांना गुलाम समजतो हे सांगितलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सफाई कर्मचारी यांचे पाय धुतात हा व्हिडिओ. दुसऱ्या बाजूला नाना पटोले सारखे माणस.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number