अजित पवारांच्या स्ट्रॅटेजिक मास्टर स्ट्रोकमुळे राष्ट्रवादी मजबूत स्थितीत

अजित पवारांचं मोठ यश  : अणुशक्ती नगर आणि दिंडोरीतील शिवसेना-शिंदे गटातील उमेदवारांनी घेतली  माघार<br/><br/>

अजित पवारांच्या स्ट्रॅटेजिक मास्टर स्ट्रोकमुळे राष्ट्रवादी मजबूत स्थितीत
MANUNILE

मुंबई : मुंबई : अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने विधानसभेच्या निवडणुकीत महत्त्वपूर्ण यश मिळवलं आहे. अणुशक्ती नगर आणि दिंडोरीतील शिवसेनेतील दोन उमेदवारांनी आज माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादीला मजबूत आधार मिळाला आहे. अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून अविनाश हैबत राणे आणि दिंडोरी मतदारसंघातून धनराज हरिभाऊ महाले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.

दिंडोरी मतदारसंघात विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी दिली आहे, तर अणुशक्ती नगरमध्ये नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे.

या माघारीमुळे महायुतीसाठी मतदानाच्या आधी एक महत्त्वाचा दिलासा मिळालाय. अजित पवारांनी या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावली आहे, ज्यामुळे पक्षाची ताकद वाढवण्यास आणि मित्रपक्षांमध्ये एकता राखण्यास मदत झाली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number