BMC Election Results 2026 : ना डॅडींची ताकद चालली, ना वायकरांचा करिश्मा! मुंबई महापालिका निवडणुकीत ‘या’ बड्या नेत्यांच्या नातेवाईकांचा सुपडा साफ

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या बड्या नेत्यांच्या मुला-मुलींना आणि नातेवाईकांना या निवडणुकीत मोठा दणका बसला असून, ठाकरे गटाने अनेक प्रतिष्ठेच्या जागांवर वर्चस्व सिद्ध केले आहे.<br/>

BMC Election Results 2026 : ना डॅडींची ताकद चालली, ना वायकरांचा करिश्मा! मुंबई महापालिका निवडणुकीत ‘या’ बड्या नेत्यांच्या नातेवाईकांचा सुपडा साफ

BMC Election Results 2026: मुंबई महानगरपालिकेच्या रणधुमाळीत यंदा मतदारांनी 'नातेवाईक' आणि 'राजकीय वारसां'ना स्पष्ट नाकारल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या बड्या नेत्यांच्या मुला-मुलींना आणि नातेवाईकांना या निवडणुकीत मोठा दणका बसला असून, ठाकरे गटाने अनेक प्रतिष्ठेच्या जागांवर वर्चस्व सिद्ध केले आहे.

शिंदे गटाला वैयक्तिक धक्के 

समाधान सरवणकर (माहीम-प्रभादेवी): दादरच्या बालेकिल्ल्यात सदा सरवणकर यांचे चिरंजीव समाधान सरवणकर यांचा ठाकरे गटाच्या निशिकांत शिंदे यांनी 603 मतांनी पराभव केला. मतमोजणीवर आक्षेप घेऊनही समाधान यांना विजय मिळवता आला नाही.

हेही वाचा – BMC Election Results 2026: मुंबईत 'ठाकरे फॅक्टर' फेल? महायुतीची सुसाट मुसंडी; देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेत सत्तांतराचे संकेत?

दीप्ती वायकर-पोतनीस (जोगेश्वरी): खासदार रवींद्र वायकर यांच्या कन्येलाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. वॉर्ड क्रमांक 73 मधून ठाकरे गटाच्या लोना रावत यांनी त्यांचा पराभव करत वायकरांचा गड पोखरला.

वैशाली शेवाळे (धारावी): माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या वहिनी वैशाली शेवाळे यांचा काँग्रेसच्या आशा काळे यांनी 1450 मतांनी पराभव केला.

इतर दिग्गजांना बसलेले हादरे

नवाब मलिकांना धक्का: राष्ट्रवादी (अजित पवार गट) नेते नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांचा कुर्ला (वॉर्ड 165) मध्ये काँग्रेसच्या अशरफ आझमींनी पराभव केला.

डॅडींच्या कन्येची पिछेहाट: भायखळ्यातील प्रबळ उमेदवार मानल्या जाणाऱ्या अरुण गवळी यांच्या कन्या योगिता गवळी यांनाही पराभवाचा धक्का बसला असून, तिथे भाजपच्या उमेदवाराने बाजी मारली आहे. 

हेही वाचा – KDMC Election Results 2026 : केडीएमसीमध्ये महायुतीचा 'डंका'; निकाल पूर्ण होण्याआधीच भाजपकडून 50-50 चा 'महापौर' फॉर्म्युला!

कुणाचे वारसदार विजयी झाले?

पराभवाच्या लाटेतही काही नातेवाईकांनी आपला विजय निश्चित केला आहे:

तेजस्वी घोसाळकर (भाजप): माजी नगरसेवक दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी दहिसरमधून 10000 हून अधिक मतांनी दणदणीत विजय मिळवला.

प्रकाश दरेकर (भाजप): भाजप नेते प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर यांनी प्रभाग 3 मधून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला.

पूजा महाडेश्वर (ठाकरे गट): माजी महापौर दिवंगत विश्वनाथ महाडेश्वर यांची कन्या पूजा महाडेश्वर यांनी वडिलांचा वारसा जपत विजय मिळवला.

सोनम जामसूतकर (ठाकरे गट): मनोज जामसूतकर यांची कन्या सोनम यांनीही दक्षिण मुंबईतून विजय खेचून आणला.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number