Kalamb Municipal Council : ठाकरे गटाला मोठा धक्का; कळंब नगर परिषदेतील मविआचे 10 नगरसेवक भाजपच्या वाटेवर

धाराशीव : धाराशीव येथील कळंब नगर परिषदेतील राजकीय समीकरणांना मोठा धक्का बसणार असून उद्धव ठाकरे गटाचे 9 आणि काँग्रेसचा 1 नगरसेवक आज, गुरुवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. आज सोलापूर येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे गटाच्या 9 नगरसेवकांसह काँग्रेसच्या एका नगरसेवकाचाही भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. […]

Kalamb Municipal Council : ठाकरे गटाला मोठा धक्का; कळंब नगर परिषदेतील मविआचे 10 नगरसेवक भाजपच्या वाटेवर

धाराशीव : धाराशीव येथील कळंब नगर परिषदेतील राजकीय समीकरणांना मोठा धक्का बसणार असून उद्धव ठाकरे गटाचे 9 आणि काँग्रेसचा 1 नगरसेवक आज, गुरुवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. आज सोलापूर येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे गटाच्या 9 नगरसेवकांसह काँग्रेसच्या एका नगरसेवकाचाही भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. प्रवेश करणाऱ्यांमध्ये 8 निवडून आलेले नगरसेवक आणि 1 स्वीकृत नगरसेवक, तसेच काँग्रेसच्या नगरसेविकेचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. एकूण 10 नगरसेवकांच्या पक्षप्रवेशामुळे कळंब नगर परिषदेतील सत्तेची समीकरणे बदलणार असून भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीचे पारडे आता जड होणार आहे.

हेही वाचा : PM Modi cabinet: कॅबिनेट बैठकीत मंत्र्यांची ‘सोशल मीडिया टेस्ट’! डिजिटल रिपोर्ट कार्डमधून समोर आली कामगिरी; कोण ठरलं अव्वल, कोण पिछाडीवर?

कळंब नगर परिषदेतील पक्षीय बलाबल –  

शिंदेसेना – 4 नगरसेवक 
भाजप – 6 नगरसेवक
उद्धव ठाकरे गट – 9 नगरसेवक
काँग्रेस – 1 नगरसेवक

महायुतीकडे 10, तर महाविकास आघाडीकडे 10 नगरसेवक असे समान बलाबल आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number