नितेश राणेंविरोधात लुकआऊट नोटीस जारी? ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रेंचा गंभीर दावा; पासपोर्ट वितरणावरही प्रश्नचिन्ह

नितेश राणे यांनी संबंधित कंपनीकडून मोठे कर्ज घेतले होते, मात्र ते न फेडता राणे देश सोडून पळून जाऊ शकतात असा संशय कंपनीला होता; त्यामुळे ही नोटीस जारी करण्यात आल्याचे चित्रे यांनी स्पष्ट केले.
नितेश राणेंविरोधात लुकआऊट नोटीस जारी? ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रेंचा गंभीर दावा; पासपोर्ट वितरणावरही प्रश्नचिन्ह
Akhil Chitre, Nitesh Rane

भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार नितेश राणे यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस (Lookout Notice) काढण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत चित्रे यांनी यासंबंधीची काही कागदपत्रे सार्वजनिक केली. एका खासगी गृहवित्त कंपनीने (दिवाण हाऊसिंग) राणेंच्या विरोधात ही नोटीस बजावली होती, असा दावा त्यांनी केला आहे. नितेश राणे यांनी संबंधित कंपनीकडून मोठे कर्ज घेतले होते, मात्र ते न फेडता राणे देश सोडून पळून जाऊ शकतात असा संशय कंपनीला होता; त्यामुळे ही नोटीस जारी करण्यात आल्याचे चित्रे यांनी स्पष्ट केले.

38 गुन्हे दाखल असताना पासपोर्ट कसा मिळाला?

अखिल चित्रे यांनी पुढे बोलताना नितेश राणे यांच्या पासपोर्ट वितरणावर आणि त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांवर कडक ताशेरे ओढले. राणे यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांत तब्बल 38 गुन्हे दाखल असून त्यातील काही गुन्हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत, असा दाखला त्यांनी दिला. कायदा आणि पासपोर्ट कायद्यानुसार ज्या व्यक्तींवर गंभीर गुन्हे असतात त्यांना सहजपणे पासपोर्ट मिळत नाही; त्यासाठी उच्च न्यायालयाची विशेष परवानगी आणि आदेश आवश्यक असतात. एवढे गंभीर गुन्हे पाठीशी असताना नितेश राणेंना कोणत्या न्यायालयाच्या आदेशाने पासपोर्ट मंजूर करण्यात आला, असा थेट आणि रोखठोक सवाल ठाकरेसेनेच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा – महायुतीत जागावाटप होताच नवा ट्विस्ट! पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे जाताच शिंदेंचा मोठा निर्णय, महायुतीला मोठा तडा?

राणेंना उत्तर देण्याचे आव्हान

नितेश राणे यांच्या रोजच्या वक्तव्यांवर टीका करताना चित्रे म्हणाले की, राणे सातत्याने बिनबुडाचे आरोप करत असतात, मात्र स्वतःवरील गंभीर प्रकरणांवर कधीही भाष्य करत नाहीत. दिशा सालियन यांच्या आईने मालवणी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीचा संदर्भ देत, या प्रकरणात राणे जामिनावर बाहेर आहेत की नाही, याचे स्पष्टीकरण त्यांनी जनतेला द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. 7 एप्रिल 2021 मधील लुकआऊट नोटीस प्रकरण आणि पासपोर्ट मंजुरीबाबत राणे यांनी स्वतः समोर येऊन सत्य सांगायला हवे, असे आव्हानही ठाकरेसेनेकडून देण्यात आले आहे. या नव्या आरोप सत्रामुळे दोन्ही पक्षांमधील राजकीय वाद चांगलाच पेटला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version