Pratap Sarnaik : "2022 ची परिस्थिती वेगळी, आता मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करू" शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा? सरनाईकांच्या वक्तव्याने खळबळ

मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज माध्यमांसमोर मराठी भाषा, ईव्ही वाहनं आणि राज्यातील राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी राज्यातील राजकारणात खळबळ उडेल असं धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

Pratap Sarnaik : &quot2022 ची परिस्थिती वेगळी, आता मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करू&quot शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा? सरनाईकांच्या वक्तव्याने खळबळ

मराठी भाषा, ईव्ही वाहनं आणि राज्यातील राजकीय मुद्द्यांवर मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी राज्यातील राजकारणात खळबळ उडेल असं धक्कादायक वक्तव्य केलं आहे. भविष्यात पक्षाचे संख्याबळ वाढल्यास शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्रिपदावर नक्कीच दावा सांगेल, असे वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. 

गणेश नाईक यांच्या टीकेवर बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, “महायुतीमध्ये वाद निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहे. राहिला मुद्दा क्लस्टरचा…एकनाथ शिंदे यांनी ही योजना आणली. ठाण्यात चांगल्या पद्धतीने ही योजना राबवली जात आहे. नवी मुंबईत पण गणेश नाईक यांनी ही योजना राबवावी. सर्वसामान्य यांचा फायदा…गेली अनेक वर्ष नवी मुंबई महापालिका गणेश नाईक यांच्या हातात त्यावर मला फार बोलायचं नाही. संख्याबळ महत्त्वाची 2022 ची परिस्थिती वेगळी आता वेगळी… संख्याबळ वाढली तर नक्की मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करू.”

पुढे म्हणाले की, “देशाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महायुतीचे सरकार यांनी जास्तीजास्त चार्जिंग स्टेशन व्हाव्या आणि गाड्या ईव्ही व्हेहिकल व्हाव्या यासाठी प्रयत्न करत आहोत. सरकारने त्यासाठी अनेक योजना आणल्या. टाटा सारखी मोठी कंपनी पुढाकार घेत आहे. त्याचा शुभारंभ झाला आहे हिरवा झेंडा दाखवून. राज्यात जितकी पूल आहे mmrda आणि st महामंडळाला द्यावा . मिठाया प्रमाणात चार्जिंग स्टेशन उभारता येतील.”

हेही वाचा- Raj Thackeray : राज ठाकरे पुन्हा ‘ॲक्शन मोड’मध्ये! महाराष्ट्र दौऱ्यांनंतर मुंबईत बैठकांचा सपाटा; Gen-Z च्या आंदोलनानंतर…

तसेच पुढे प्रवाशांसोबत जुजबी मराठी बोलता आलं नाही तर आरटीओ कायद्याच्या अंतर्गत कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. टॅक्सी आणि रिक्षा चालकांची मुजोरी चालणार नाही. असा थेट इशारा त्यांनी दिला. यावेळी सरनाईक म्हणाले की, “1 लाख 35 हजार मराठी शिकण्यासाठी अर्ज प्राप्त झाले. प्रचंड प्रतिसाद मिळाला.कोकण मराठी साहित्य परिषद यांनी देखील पुढाकार घेतला. Rto अधिकारी देखील सहभागी. गडकरी रंगायतन येथे समाप्ती कार्यक्रम पार पडेल. जर त्यांनंतर मराठी ऐकले नाही तर कारवाई. त्यांनी संधी मागितली आम्ही संधी दिली. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून त्यांना प्रमाण पत्र देण्यात येणार. मराठी rto अधिकारी बोलणार परीक्षा घेणार.”

“माज केला तर ऐकणार नाही. मराठी भाषा विभागाचा मंत्री मी नाही. कायद्याने जी बंधने मला घातली त्या बंधनाचा आणि कायद्याचा वापर करून मी कारवाई केली.मराठी मंत्री किंवा जर एका साहित्यिकांचा मुलगा म्हणून त्यांनी सांगितलं तर नक्की मराठी शिकवेन त्यांची इच्छा असेल तर… 36 वर्षात जर तुम्हाला मराठी शिकता आलं नाही तर आता काय पुढच्या 100 दिवसात शिकणार. मराठी येत नसेल तर हे महाराष्ट्राचे दुर्दैव, कारवाई अटळ, नागपूरहून मुंबईकडे येणारे हे वाहन आहे. वाहनचालकावर गुन्हा दाखल.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number