Shiv Sena UBT Gat : शिवसेना उबाठा गटाला धक्का; पुण्यातील या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यानं दिला पदांचा राजीनामा

पुणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात एकीकडे बंड होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच विविध पदावरील कार्यकर्ते, नेते मंडळीदेखील पदाचा राजीनामान देताना पाहायला मिळत आहे. शिवसेना उबाठा गटाचे ओंकार शिवाजी तुपे यांनी आज, मंगळवारी उपजिल्हा युवा अधिकारी युवासेना पुणे पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा आमदार आदित्य ठाकरे यांना दिला असून याबाबत एक्स पोस्ट शेअर केली आहे. […]

Shiv Sena UBT Gat : शिवसेना उबाठा गटाला धक्का; पुण्यातील या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यानं दिला पदांचा राजीनामा

पुणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात एकीकडे बंड होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच विविध पदावरील कार्यकर्ते, नेते मंडळीदेखील पदाचा राजीनामान देताना पाहायला मिळत आहे. शिवसेना उबाठा गटाचे ओंकार शिवाजी तुपे यांनी आज, मंगळवारी उपजिल्हा युवा अधिकारी युवासेना पुणे पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा आमदार आदित्य ठाकरे यांना दिला असून याबाबत एक्स पोस्ट शेअर केली आहे. यामुळे पुन्हा एकदा उबाठा गटाला मोठा झटका मिळाला आहे. आधीच राजकीय वर्तुळात उबाठा गटातील आमदार, खासदार बंड करण्याच्या वृत्तांचा उधाण आले आहे. अनेकांनी शिवसेना आणि भाजपची वाट धरली आहे. त्यात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा राजीनाम समोर येत असून अद्याप पक्ष सोडण्याचे किंवा इतर पक्षात जाण्याचे कोणतेही संकेत तुपे यांनी दिलेले नाही. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा : PM Kisan 23rd Installment Date: शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार पीएम किसान योजनेचे 2000 रुपये

काय म्हटले आहे एक्स पोस्टमध्ये – 

माझ्या आजपर्यंतच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासात साथ देणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे, हितचिंतकांचे आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो…

सन 2015 पासून राजकारण आणि समाजकारणात सक्रियपणे कार्य करत असताना अनेक अनुभव मिळाले, अनेक चांगली माणसे जोडली गेली आणि जनतेच्या विविध प्रश्नांसाठी काम करण्याची संधी मिळाली. या काळात मिळालेला विश्वास, प्रेम आणि सहकार्य हे माझ्यासाठी कायम प्रेरणादायी राहील..

पदाचा राजीनामा दिला असला तरी समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि जनसेवेची भावना कायम राहील. यापुढील काळातही सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी, युवकांच्या हक्कांसाठी आणि समाजहिताच्या विषयांसाठी मी पूर्वीप्रमाणेच सक्रिय राहणार आहे…

आजपर्यंत ज्यांनी मला साथ दिली, मार्गदर्शन केले आणि माझ्यावर विश्वास ठेवला त्या सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार…

ओंकार शिवाजी तुपे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number