Sunetra Pawar : "आतापर्यंत दादांनी पक्षातील सर्वांचे हट्ट पुरवले, यापुढे अनावश्यक हस्तक्षेप केला तर…" सुनेत्रा पवारांचा सुचक इशारा

राष्ट्रवादीचा वर्धापन दिवस हा काल 10 जून रोजी होता मात्र काल NDAची दिल्लीत बैठक असल्याने पक्षाच्या अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत दिल्लीत वर्धापन दिवस साजरा केला.

Sunetra Pawar : &quotआतापर्यंत दादांनी पक्षातील सर्वांचे हट्ट पुरवले, यापुढे अनावश्यक हस्तक्षेप केला तर…&quot सुनेत्रा पवारांचा सुचक इशारा

राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा 27 वा वर्धापन दिवस आज मुंबईत साजरा केला गेला. राष्ट्रवादीचा वर्धापन दिवस हा काल 10 जून रोजी होता मात्र काल NDA ची दिल्लीत बैठक असल्याने पक्षाच्या अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत दिल्लीत वर्धापन दिवस साजरा केला. आज राष्ट्रवादीचा वर्धापन दिवस मुंबईतील ष्णानमुखांनंद हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पक्षातील सर्व आमदार खासदार मंत्री तसेच राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुनेत्रा पवारांनी आपला पक्ष दिवंगत नेते अजित पवार यांच्याच विचारांनी चालेल. तसेच पक्षात अनावश्यक हस्तपेक्ष झाल्यास मला कटू निर्णय घ्यावा लागेल, असं म्हणत भर सभेत दम भरल्याचे पाहायला मिळाले. 

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “आतापर्यंत अजित दादांनी पक्षातील सर्वांचे हट्ट पुरवले.. सर्वांना त्यांच्या त्यांच्या परीने खूप काही देण्याचा प्रयत्न केला पण इथून पुढे पक्षातील हस्तक्षेप घेणार नाही.. पक्षाला प्राधान्य दिलं जाईल हे सर्वांनी लक्षात घ्यावं.. महामंडळाच्या लवकरच नियुक्त्या केल्या जाणार आहे.. प्रत्येक कार्यकर्त्याची निष्ठा, काम आणि समर्पण माझ्या लक्षात आहे. योग्य वेळी त्याला न्याय आणि संधी मिळणार याची खात्री देते. पक्षात कोणी किती काळ काम केलं याहीपेक्षा कोणी पक्षाला पुढे नेलं त्यांना प्राधान्य दिलं जाईल… दादा ज्या प्रमाणे पक्षहितासाठी कठोर निर्णय घेत, तसेच निर्णय घेतले जातील. ते माझ्या स्वभावाला जड जाईल, पण दादांच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. मला खात्री आहे, पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे पक्षहिताच्या निर्णयामध्ये माझी साथ देतील.”

हेही वाचा- Nashik Vidhan Parishad Election 2026: नाशिक विधान परिषदेतील सस्पेन्स संपला; गिरीश महाजन आणि उदय सामंत यांची शिष्टाई फळाला

“राज्यातल्या लाखो महिलांना लाडक्या बहिणीमुळे आर्थिक पाठबळ मिळाले. बळीराजाल कर्जमाफी पोहचवणे हे राष्ट्रवादी कार्यकर्त्याचे काम आहेत एनडीएमध्ये काम करताना .. पण समाजातील सगळ्या घटकांसाठी आपण काम करूः सर्व समाज घटकांना सन्मान देणे हेच आपले उदिष्ट असेल. ग्रामीण भागात आणि शहरी भागात मतदारसंघ वाढणार आहे. नेहमीच्या पक्षाच्या वतीने बीएलओ ने चांगले काम करावे. सगळ्यांनी गांभिर्याने काम केले गेले पाहीजे. बुथ प्रमुखांचा सन्मान केला जाईल.”

“पक्षाची खरी ताकद ही ग्रामीण भागातील लोकांमध्ये सुद्धा असते. संघटन मजबूत करण्यासाठी सगळ्यांनी कामाला लागले पाहीजे. जेष्टता सन्मान आणि तरुणांना संधी हे आपण साध्य केले पाहीजे. पुढील वाटचाली जेष्टाचा सन्मान, तरुणांना संधी, महिलांचा सन्मान याच त्रीसुत्री असेल. योग्य वेळी प्रत्येकाला न्याय आणि सन्मान मिळेल याची खात्री देते. यापूर्वी जे घडलं ते पाहीले समजून घेतलं. दादांनी सगळ्यांना मान सन्मान दिली पदं दिली यापुढे मी पक्षाच्या हिताला प्राधान्य देईन कुणाचा ही अनावश्यक हस्तक्षेप असेल तर मी लक्ष दैईस. दादा ज्याप्रमाणे कठोर निर्णय घेत होते तसे मी ही घेईल. अधिक जागृतपणे काम करा.. मला कठोर भुमिका घेण्याची वेळ येणार नाही असेच मला अपेक्षित आहे.”

“महामंडळाच्या नियुक्त्या करताना पक्षासाठी समर्पण आणि त्यागाचा विचार केला जाईल आम्ही सगळेजण ठरवू गुणवत्ता पक्षासाठी किती वर्ष काम केले पेक्षा पक्ष त्या काळात किती वाढला याचा विचार केला जाईल.  काही लोकांना पक्षवाढी साठी घेतले जाताना त्यांचा योग्य सन्मान करावा लागतो. विचारांनी आपण कधीही तडजोड केली नाही यापुढे ही केली जाणार नाही ही मी ग्वाही देते.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number