सातारा जिल्हा बँक निवडणुकीत ट्विस्ट; कराड सोसायटी गटात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी लढत, 21 पैकी 12 जागा बिनविरोध

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 पैकी 12 जागा बिनविरोध झाल्या आहेत.

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत ट्विस्ट; कराड सोसायटी गटात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी लढत, 21 पैकी 12 जागा बिनविरोध
satara district central cooperative bank

कराड : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 पैकी 12 जागा बिनविरोध झाल्या आहेत. कृषी उत्पादन व प्रक्रिया संस्था गटातून भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. आता उर्वरित 9 जागांमध्ये कराड सोसायटी गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. उदयसिंह पाटील – उंडाळकर आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय पाटील या महायुतीच्या उमेदवारांमध्ये टशन पाहायला मिळणार आहे. मात्र, भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार डॉ. अतुल भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अ‍ॅड. उदयसिंह पाटीलउंडाळकर यांना मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे.

हेही वाचा : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात आरोपींची संख्या 10 वर; खऱ्या सूत्रधाराचं नावं अखेर समोर? हरियाणाशी काय कनेक्शन?

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या टप्प्यात नाट्यमय घडामोडी घडल्या. राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा, सहकारातील वर्चस्व आणि आगामी राजकीय समीकरणे लक्षात घेऊन सत्ताधारी व विरोधकांनी आपापली रणनीती आखली होती. या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघातील 11 जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय आधी झाल्यानंतर उरलेल्या 10 जागांचे भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना या तीन पक्षांनी एकमेकांत वाटप केले. या वाटाघाटींमध्ये भाजपला 5, राष्ट्रवादीला 3 तर शिवसेनाला 2 जागा मिळाल्या. आतापर्यंत भोपळ्यावर असलेल्या शिवसेनेला एका जागेवर बिनविरोधची संधी मिळाली. तर भाजपला 5 व राष्ट्रवादीला 3 जागांवर आपले उमेदवार बिनविरोध निवडून देण्यात यश आले. या निवडणुकीत 21 पैकी 9 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित 12 जागांसाठी लढती रंगणार आहेत.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीतील नेत्यांनी समन्वय साधत अनेक ठिकाणी बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा केला. भाजपचे नेते शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांनी राजकीय ताकद पणाला लावली. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मकरंद पाटील, खा. नितीन पाटील तर शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई, आ. रामराजे नाईक निंबाळकर या नेत्यांनीही आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यामुळे या निवडणुकीत केवळ उमेदवारांमधील लढत न राहता, राजकीय पक्षांच्या प्रतिष्ठेचीही कसोटी लागली आहे. राहता, राजकीय पक्षांच्या प्रतिष्ठेचीही कसोटी लागली आहे. या निवडणुकीमध्ये जावली, कराड, कोरेगाव, महाबळेश्वर, पाटण, फलटण, खंडाळा, माण या आठ सोसायटी मतदारसंघांमध्ये ‘हायहोल्टेज ड्रामा’ पहायला मिळणार आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number