Sanjay Pawar: शरद पवार आणि अजित पवारांचे फोटो आता एकाच बॅनरवर दिसणार; संजय पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांनी दिली ‘त्या’ पत्राला संमती

अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते एकत्र येण्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

Sanjay Pawar: शरद पवार आणि अजित पवारांचे फोटो आता एकाच बॅनरवर दिसणार; संजय पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांनी दिली ‘त्या’ पत्राला संमती

Sanjay Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठ्या फुटीनंतर पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनी कोणालाही आपला फोटो बॅनरवर न वापरण्याचे जाहीर आवाहन केले होते. मात्र, राष्ट्रवादीचे नेते संजय पवार यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेऊन एक महत्त्वपूर्ण परवानगी मिळवली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते एकत्र येण्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. संजय पवार यांनी शरद पवारांची भेट घेऊन दोन्ही नेत्यांचे फोटो एकत्र वापरण्याची विनंती केली आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचा दावा केला आहे.

बाळासाहेब ठाकरेंचे उदाहरण देत शरद पवारांकडे परवानगीची मागणी

संजय पवार यांनी शरद पवारांना एक पत्र सादर करून जुन्या राजकीय घडामोडींचे दाखले दिले. ते म्हणाले, “ज्याप्रमाणे राज ठाकरे किंवा एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुखांपासून वेगळे झाले, तरीही त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा आदर राखत त्यांचे फोटो वापरणे कधीच सोडले नाही. मग आमच्यावरच ही बंदी का?” अजित पवार हे नेहमीच शरद पवारांना गुरुस्थानी मानत आले आहेत, हाच धागा पकडून संजय पवारांनी दोन्ही पवारांचे फोटो बॅनरवर लावण्याची परवानगी मागितली. शरद पवारांनी या पत्रावर स्वाक्षरी करून मान्यता दिली असून, हा संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी एक अत्यंत सकारात्मक बदल असल्याचे संजय पवारांनी सांगितले.

दोन्ही राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकत्र येणार का? लहान कार्यकर्त्याची मोठी इच्छा

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतेवर बोलताना संजय पवार म्हणाले की, पक्ष एकत्र यावा ही प्रत्येक कार्यकर्त्याची प्रामाणिक इच्छा आहे. मात्र, यावर अंतिम निर्णय घेणे आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनीसाहेब पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांच्या हातात आहे. लहान कार्यकर्त्यांनी यावर थेट भाष्य करणे योग्य नाही, परंतु शरद पवार हे कार्यकर्त्यांसाठी ‘बारामतीचा विठ्ठल’ आहेत आणि विठ्ठलाचा फोटो लावण्याचा अधिकार प्रत्येक वारकऱ्याला म्हणजेच कार्यकर्त्याला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेह वाचा – Uddhav Thackeray : ठाकरेंचा बंडखोर खासदारांना दणका! ऑपरेशन टायगरला ठाकरे गटाचे कायदेशीर आव्हान; एका पत्राने पकडलं कोंडीत

सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढील वाटचाल

अजित पवारांच्या पश्चात सुनेत्रा पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबावर मोठा आघात झाला असून या दुःखातून सावरण्यासाठी त्यांना वेळ लागेल, अशी भावना संजय पवारांनी व्यक्त केली. अशा कठीण काळात ग्रामीण आणि जिल्हा पातळीवरील कार्यकर्त्यांना सांभाळणारे नेतृत्व म्हणून ते खासदार सुनील तटकरे यांच्याकडे पाहत आहेत. बॅनरवर फोटो वापरण्याच्या अधिकृत मान्यतेसाठी ते सुनील तटकरे यांनाही पत्र लिहिणार असून, पक्ष पातळीवर यावर सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या नव्या घडामोडींमुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात फोटो डिप्लोमसी आणि पक्ष विलीनीकरणाच्या हालचाली वेग घेण्याची शक्यता आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number