Ambadas Danve : ‘पंतप्रधान मोदी पदवी दाखवत नाहीत, मग कसलं आवाहन करता?’; पेपरफुटीवरून अंबादास दानवेंचा संतप्त सवाल

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदवी आहे असे सांगून ते ती लपवून ठेवतात, मग ते नेमके काय आवाहन करत आहेत?' असा थेट आणि रोखठोक सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.

Ambadas Danve : ‘पंतप्रधान मोदी पदवी दाखवत नाहीत, मग कसलं आवाहन करता?’; पेपरफुटीवरून अंबादास दानवेंचा संतप्त सवाल

Ambadas Danve : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदवी आहे असे सांगून ते ती लपवून ठेवतात, मग ते नेमके काय आवाहन करत आहेत?’ असा थेट आणि रोखठोक सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे. देशभरात गाजत असलेल्या पेपरफुटीच्या प्रकरणांवरून त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.

लपवाछपवी कशासाठी? मी माझी पदवी दाखवायला तयार 
अंबादास दानवे पुढे म्हणाले की, “गोष्टी लपवून ठेवण्यामागे नेमके काय साध्य होणार आहे? लपवाछपवीचा काय उपयोग? अभिजीत दिपके जर स्वत:ची पदवी आणि सर्व आवश्यक कागदपत्रे सार्वजनिक रीतीने सादर करायला पूर्णपणे तयार असेल, तर पंतप्रधानांनीही ती दाखवावी. त्यानंतर खरी वस्तुस्थिती जनतेसमोर येईल,” असंही त्यांनी म्हटलं आहे.  

हेही वाचा – Anil Deshmukh: अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ! मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीला राज्यपालांची मंजुरी; खटल्याचा मार्ग अखेर मोकळा

त्यांनी तीव्र चिंता व्यक्त करताना म्हटले की, “हा केवळ एका परीक्षेचा मुद्दा नसून देशभरातील तब्बल 30 लाख तरुण-युवतींच्या भविष्याचा प्रश्न आहे. आज देशभरात सर्वत्र पेपरफुटीच्या घटना घडत आहेत. यामध्ये नक्कीच देशविरोधी घटक कार्यरत आहेत, मग ते घटक नेमके कुठे आहेत आणि त्यांच्यावर काय कारवाई होत आहे?” असा सवालही त्यांनी विचारला.

शिवसेनेच्या दोन नेत्यांच्या भेटीवरून शंका
दरम्यान, शिवसेनेचे दोन प्रमुख नेते एका कुटुंबाची भेट घ्यायला येत असल्याच्या घडामोडीवर भाष्य करताना दानवे म्हणाले, “या परिस्थितीत काहीतरी गडबड वाटतेय. गुप्तता पाळून काय साध्य करायचे आहे? मी या संपूर्ण प्रकरणातील सर्व गोष्टी योग्य वेळी नक्कीच उघड करेन,” असा इशाराही त्यांनी दिला.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number