शरद पवारांच्या आग्रहास्तव पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 नोव्हेंबरला बारामतीत; विद्या प्रतिष्ठानच्या ‘प्रेरणास्थळ’ मेडिटेशन सेंटरचे करणार लोकार्पण

बारामतीतील नामांकित विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलात नव्याने उभारण्यात आलेल्या 'प्रेरणास्थळ' या अत्याधुनिक मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
शरद पवारांच्या आग्रहास्तव पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 नोव्हेंबरला बारामतीत; विद्या प्रतिष्ठानच्या ‘प्रेरणास्थळ’ मेडिटेशन सेंटरचे करणार लोकार्पण
PM Baramati visit

PM Narendra Modi Baramati Visit: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) सर्वेसर्वा शरद पवार यांनी बारामती दौऱ्यावर असताना एक अत्यंत महत्त्वाची राजकीय व सामाजिक बातमी जाहीर केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आगामी 3 नोव्हेंबर रोजी बारामती शहराच्या दौऱ्यावर येत आहेत. बारामतीतील नामांकित विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलात नव्याने उभारण्यात आलेल्या ‘प्रेरणास्थळ’ या अत्याधुनिक मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. याच सोहळ्यात संकुलात उभारण्यात आलेल्या भगवान गौतम बुद्ध यांच्या भव्य दिव्य पुतळ्याचे अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते केले जाईल. बारामतीतील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

आचारसंहितेमुळे रखडलेला कार्यक्रम अखेर निश्चित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीला भेट द्यावी, अशी औपचारिक विनंती शरद पवार आणि विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तांकडून आधीच करण्यात आली होती. मात्र, निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्याकारणाने हा नियोजित दौरा काही काळ पुढे ढकलावा लागला होता. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे, संबंधित केंद्रीय मंत्री आणि विद्या प्रतिष्ठानच्या सदस्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर सर्व औपचारिकता पूर्ण होऊन पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी 3 नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता पंतप्रधान मोदी बारामती विमानतळावर दाखल होतील आणि थेट विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

हेही वाचा – ‘राम पूर्णेकर यांनी काही गोष्टी डोळ्यांनी..’ मीनाक्षी शिंदे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत यांचे स्पष्टीकरण

‘प्रेरणास्थळ’ संकल्पनेतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास

विद्या प्रतिष्ठानच्या संकुलात उभारलेले हे ‘प्रेरणास्थळ’ विद्यार्थ्यांमध्ये आत्मचिंतन, ध्यानधारणा आणि उच्च नैतिक मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. या ठिकाणी तयार केलेल्या भव्य डोममध्ये भगवान बुद्धांची मूर्ती आणि देशातील महान विभूतींची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह जगभरातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. मायक्रोसॉफ्टचे प्रमुख, ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्रतिनिधी, उद्योगपती आणि शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गजांना या सोहळ्यासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version