प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; उत्तर प्रदेशातून आणखी एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात

प्रदीप पूर्णेकर यांना संपवणाऱ्या दुसऱ्या आरोपीला प्रयागराजमधून अटक करण्यात आली.
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; उत्तर प्रदेशातून आणखी एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात

ठाणे विभागप्रमुख (उबाठा गट) प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.

या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली असून, आरोपी अमित सिंह याला प्रयागराज येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापूर्वी शुक्रवारी या प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष कनोजियाला अटक करण्यात आली होती. पोलिसांकडून या प्रकरणाचा जलद गतीने तपास सुरू असून आतापर्यंत दोन आरोपी जेरबंद झाले आहेत.

मात्र, या प्रकरणात पूर्णेकर कुटुंबीयांनी पुराव्यांसह आरोप केलेल्या मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती यांच्या भूमिकेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या हत्याकांडामागे त्यांचा हात आहे का, या दिशेने पोलिसांचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत लवकरच सुनावणी होणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, मीनाक्षी शिंदे यांच्या अटकेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या प्रकरणात पूर्णेकर कुटुंबीयांना न्याय मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईतही एल्गार! संजय राऊत अन् आदित्य ठाकरेंचा पोलीस ठाण्यात ठिय्या

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version