Saturday, December 06, 2025 11:26:41 AM

Rupali Thombare Patil : बहिणीच्या प्रकरणावरून वाद पोलीस ठाण्यात; रुपाली पाटील-ठोंबरे यांचा राजकीय प्रवास कठीण वळणावर

वरिष्ठ अधिकाऱ्यांशी उलटसुलट बोलणे आणि गोंधळ घालण्याचा आरोप होत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आधीपासूनच पक्षांतर्गत वादाचा सामना करत असताना ही घटना त्यांची अडचण वाढवणारी ठरली आहे.

rupali thombare patil  बहिणीच्या प्रकरणावरून वाद पोलीस ठाण्यात रुपाली पाटील-ठोंबरे यांचा राजकीय प्रवास कठीण वळणावर

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर उपाध्यक्षा आणि माजी प्रवक्त्या रुपाली पाटील-ठोंबरे यांच्या राजकीय प्रवासावर पुन्हा एकदा संकट उभा राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत तणावाच्या पार्श्वभूमीवर रुपाली पाटील-ठोंबरे यांच्यावर पक्षाने सलग कारवायांची मालिका सुरू केली आहे. फलटण महिला डॉक्टर प्रकरणातील त्यांच्या तीव्र भूमिकेवरून पक्षाने आधी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली, त्यानंतर प्रवक्तेपदावरून हटवले आणि अखेर अजित पवार गटाने त्यांची पक्षातून थेट हकालपट्टीही केली. पक्षाकडून झालेल्या या कठोर कारवाईच्या सावटातून त्या सावरतही नाहीत, तोच खडक पोलीस ठाण्यातील वादामुळे त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

हेही वाचा: Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींची काळजी वाढली; योजनेची 'ही' पूर्तता लवकर करा, अन्यथा पैसे मिळणे होईल बंद?

खडक पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकारानंतर त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे.  रुपाली पाटील-ठोंबरे या त्यांच्या बहिणीवर दाखल झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाबाबत माहिती घेण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. मात्र, तिथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्याशी झालेली वादग्रस्त शब्दांची देवाणघेवाण चांगलीच अडचणीची ठरली. पोलीसांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी ठाण्यात गोंधळ घालत अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केले. याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर FIR नोंदवण्यात आली आहे.

या घटनेमुळे त्यांची राजकीय अडचण आणखी वाढली आहे. आता पोलीस प्रकरणाचा नवीन अध्याय जोडला गेल्याने त्यांचे राजकीय भवितव्य पुन्हा चर्चेत आले आहे. राजकीय वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणाला कोणता वळण मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: MCA Election 2025 Result : MCA निवडणुकीचा निकाल जाहीर; जितेंद्र आव्हाड उपाध्यक्ष, तर मिलिंद नार्वेकरांची कार्यकारिणी सदस्यपदी वर्णी


सम्बन्धित सामग्री