मोठ्या प्रमाणात ‘लक्ष्मी दर्शन’ झाल्याने पराभव; सोमेश्वर कारखाना निवडणुकीत बंडखोर पुरुषोत्तम जगताप यांचा थेट आरोप

सोमेश्वरच्या मतदारांनी बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगताप यांचा दारुण पराभव केला आहे.
purushottam jagtap
purushottam jagtap

नवनाथ बोरकर, प्रतिनिधी 

बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आव्हान देत बंडखोरी केलेले पुरुषोत्तम जगताप यांनी 21 जणांचे पॅनल या निवडणुकीत उभा केले होते. मात्र सोमेश्वरच्या मतदारांनी बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगताप यांचा दारुण पराभव केला आहे. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या श्री सोमेश्वर विकास पुरुष अजितदादा पवार गट क्रमांक 2 वाल्हा मुरूममधील पॅनलमधील तिनही उमेदवार विजयी झाले आहेत.

मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन झाल्याने पराभव

सुनेत्रा पवार यांच्या पासून बाजूला जात बंडखोरी करून पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपचे पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांना बरोबर घेत 21 जणांना सोबत घेत स्वतंत्र पॅनल उभा करून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आव्हान दिलं होतं. मात्र पुरुषोत्तम जगताप यांच्यासह सर्व उमेदवारांचा सोमेश्वरच्या मतदारांनी दारुण पराभव केला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पॅनलच्या वतीने मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन झाल्यानेच आमच्या पॅनलच्या उमेदवारांचा पराभव झाला असल्याचा आरोप पुरुषोत्तम जगताप यांनी केला आहे.

हेही वाचा : मोठी बातमी! विरोधकांना धूळ चारत सोमेश्वरच्या साखर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवारांची विजयी घोडदौड

आतापर्यंत सुनेत्रा पवार यांच्या पॅनलचे 21 पैकी सात उमेदवार विजयी – 

1 ) ऋषिकेश गायकवाड – 13,941 मतांनी विजयी

2) विक्रम भोसले – 13,854 मतांनी विजयी

3) राजवर्धन शिंदे – 14,015 मतांनी विजयी

4) पुरुषोत्तम जगताप – 7,364 बंडखोर उमेदवार पराभूत

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version