महाराष्ट्रात ठीकठीकाणी DJ बंदी वरून वाद पेटला असून त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पडताना दिसत आहेत. अशातच मनसे नेते राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत DJ बंदी हे लक्ष भरकटवण्याचे माध्यम असल्याचे सांगितले. देशांत इतर समस्या भरपूर असून त्यावरून लक्ष हटवण्यासाठी DJ बंदीचा वापर केला जातोय, असे त्यांनी म्हटले. ‘पुण्यात कायदेशीर DJ बंदी करता येत नाही’, या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर, राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या नागपुरात DJ बंदी होऊ शकते, पण पुण्यात नाही? असा खोचक प्रश्न विचारला.
तसेच सण हे पारंपारिक पद्धतीने साजरे व्हायला हवे, यावर जोर द्या, धर्मांध होऊ नका असे देखील त्यांनी बजावले. येत्या गणेशोत्सवात हिंदू-मुस्लिम दंगली घडवून येतील याविषयी ठाम बाजू मांडली. सर्वसामान्यांनी सोशल मीडियावरील धर्मभेद-जातीय तेढ यावरील आशयाला बळी न पडण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केले. तसेच दंगली न होण्यासाठी सर्व सुजाण हिंदू-मुस्लिमांनी सतर्क राहायला हवे, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.