Raj Thackeray On Ashok Kharat Case: ‘कुणाची तरी वाट लावण्यासाठी प्रकरणं बाहेर काढली…’; भोंदू खरात प्रकरणावर राज ठाकरे आक्रमक

नाशिकच्या अशोक खरात प्रकरणावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत व्यवस्थेवर टीका केली.

Raj Thackeray On Ashok Kharat Case: ‘कुणाची तरी वाट लावण्यासाठी प्रकरणं बाहेर काढली…’; भोंदू खरात प्रकरणावर राज ठाकरे आक्रमक

राज्यात चर्चेत असलेल्या नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असतानाच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी यावर पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या प्रतिक्रिया दिली आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी या प्रकरणावर परखड भाष्य करत सध्याच्या परिस्थितीवर टीकास्त्र सोडले.खरात प्रकरणात आतापर्यंत फक्त अशोक खरात यांनाच अटक झाल्याने विरोधकांकडून सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणात इतर कोणाला अटक का नाही, तसेच संबंधित राजकीय नेत्यांना चौकशीसाठी कधी बोलावले जाणार, असे सवाल सातत्याने विचारले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकरणाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला.

व्यंगचित्राशी संबंधित एका कार्यक्रमात त्यांनी माध्यमांच्या कामकाजावरही भाष्य केले. आजच्या पत्रकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, असे सांगताना त्यांनी सध्याच्या बातम्यांच्या स्वरूपावरही टीका केली. “काहीतरी वेगळं आणा, वाद निर्माण करा, अशा अपेक्षा ठेवल्या जातात. त्यामुळे अनेकदा बातम्या वैयक्तिक पातळीवर जातात,” असे ते म्हणाले.यावेळी खरात प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी अप्रत्यक्षपणे व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. “शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही, पण अशा लोकांना सर्व सुविधा मिळतात,” असा टोला त्यांनी लगावला. काही प्रकरणे ठरवून बाहेर काढली जातात का, असा सूचक सवालही त्यांनी उपस्थित केला.राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा या प्रकरणाची चर्चा रंगण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पुढे काय घडामोडी होतात आणि चौकशीचा वेग कसा राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number