‘मुंबईत ये दुबे… समंदरात डुबे-डुबे कर मारू’; भाजप खासदार निशिकांत दुबेंच्या विधानावर राज ठाकरेंचा स्फोटक प्रत्युत्तर

भाजप खासदार दुबेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर राज ठाकरे आक्रमक; “मुंबईत ये… समंदरात डुबे-डुबे कर मारू” असा इशारा. हिंदी सक्ती, मतदारसंघ षडयंत्रावरही सडकून टीका.<br/>

‘मुंबईत ये दुबे… समंदरात डुबे-डुबे कर मारू’; भाजप खासदार निशिकांत दुबेंच्या विधानावर राज ठाकरेंचा स्फोटक प्रत्युत्तर

Raj Thackeray Warns BJP MP Dubey: महाराष्ट्राच्या अस्मितेवर होत असलेल्या वारांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा तीव्र भाष्य करत भाजप खासदार निशिकांत दुबे यांना थेट इशारा दिला आहे. मिरा भाईंदर येथे आयोजित सभेत मराठी जनतेला उद्देशून भाषण करताना राज ठाकरेंनी निशिकांत दुबेच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला.

राज ठाकरे म्हणाले, ‘दुबे नावाचा भाजप खासदार म्हणतो, आम्ही मराठी लोकांना पटकून पटकून मारू. त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली का? हिंदी चॅनेलवर त्याचं वक्तव्य दाखवलं का? काहीच नाही. आम्हाला मारणार म्हणतोस? दुबे, मुंबईत ये… समंदरात डुबे-डुबे कर मारू!’ अशा थेट शब्दांत त्यांनी दुबेवर निशाणा साधला.

हेही वाचा: हिंदी सक्ती केली, तर दुकानेच नव्हे शाळाही बंद करून दाखवेन; राज ठाकरेंचा फडणवीसांना थेट इशारा

हिंदी चॅनेल आणि सत्ताधाऱ्यांवरही सडकून टीका

राज ठाकरेंनी हिंदी चॅनेलवर टीका करताना म्हटलं, ‘हिंदी चॅनेलवाल्यांना महाराष्ट्रात काही झालं की लगेच दाखवायला मिळतं. पण बिहारमध्ये आजही 99 टक्के लोक मातृभाषा बोलतात, हिंदी नाही. मराठी भाषेचा इतिहास समजून घ्या. माझं हिंदी इथल्या नेत्यांपेक्षा चांगलंच आहे, पण कुठल्याही भाषेला मी विरोध करत नाही. मात्र ती आमच्यावर लादण्याचा प्रयत्न झाला तर कधीच सहन करणार नाही.’

हिंदुत्वाच्या नावाखाली मराठीचा षडयंत्र?

राज ठाकरे म्हणाले, ‘हिंदुत्वाच्या बुरख्याखाली जर तुम्ही मराठी माणसाला संपवण्याचा डाव आखत असाल, तर माझ्यासारखा सरळसोट मराठी माणूस तुम्हाला सापडणार नाही. मीरा भाईंदर ते पालघर हे मतदारसंघ अमराठी करण्याचा डाव रचला जातोय. ही फक्त लोकं नाही, तर मतदारसंघ बनावट आहेत. उद्या याच मतदारसंघातून खासदार, आमदार, महापौर आणले जातील आणि अख्खा पट्टा गुजरातकडे वळवण्याचा डाव आहे.’

'कान्स'च्या रेड कार्पेटवर प्राजक्ता माळीचा अस्सल मराठी ठसका! फोटो पाहिलात का?

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number