Mumbai Municipal Corporation Election 2026 : मनसेला आणखी एक धक्का! वॉर्ड क्रमांक 194 नाकारणं राज ठाकरेंना पडलं महागात ; भाजप प्रवेश कन्फॉर्म

ठाकरेंच्या पक्षातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उमेदवारी न मिळाल्यामुळे महायुतीत पक्षप्रवेश करत आहेत. अशातच आता मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.

Mumbai Municipal Corporation Election 2026 : मनसेला आणखी एक धक्का! वॉर्ड क्रमांक 194 नाकारणं राज ठाकरेंना पडलं महागात ; भाजप प्रवेश कन्फॉर्म

सध्या राज्यात सुरु असलेल्या मुंबईसह 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी राजकीय नेत्यांची चांगलीच कसरत पाहायला मिळत आहे. अशातच मविआसोबतच ठाकरे बंधुंना धक्क्यांवर धक्के मिळत आहे. आधीच अनेक ठिकाणहुन महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असताना आता ठाकरेंच्या पक्षातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उमेदवारी न मिळाल्यामुळे महायुतीत पक्षप्रवेश करत आहेत. अशातच आता मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा- Mumbai Local Train: लोकल प्रवाशांना मोठा फटका; मंगळवार-बुधवारी 215 फेऱ्या रद्द, पाहा काय आहे नेमकी वेळ?

प्रभाग क्रमांक 194 मधून इच्छुक असलेले संतोष धुरी यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात युती झाल्यानंतर त्यांनी जागावाटपासाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली. दादरमधील मुंबई महापालिकेतील वार्ड क्रमांक 192 हा मनसेला देण्यात आल्यामुळे वॉर्ड क्रमांक 194 शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आला असून तिथे निशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली. वॉर्ड क्रमांक 194 साठी मनसेतून आणि संदीप देशपांडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे संतोष धुरी हे देखील इच्छुक होते.

हेही वाचा- Parli Constituency Successor: पंकजा मुंडेंकडून परळीच्या राजकीय वारसदारावर शिक्कामोर्तब; अखेर भरसभेत केली मोठी घोषणा

मात्र शिवसेना ठाकरे गटाला हा वार्ड दिल्यामुळे संतोष धुरी नाखुश होते. संतोष धुरी यांचा नाराजीचा फायदा भाजपला झाला तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या मनसेला ऐन मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर खिंडार पडली. यावेळी संतोष धुरी यांनी मंत्री नितेश राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश निश्चित केला. आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत संतोष धुरी भाजपमध्ये प्रवेश करतील. मुंबईत महापालिका निवडणूक भाजप आणि शिवसेना युती करत लढणार असून यावेळी भाजप 135 जागा लढतेय तर शिवसेना 90 जागा लढणार आहे.  
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number