‘1 तारीख आली की मनात धडकी भरते…’; LPG सिलेंडरच्या दरात वाढ होताच रोहिणी खडसेंचं खोचक ट्विट

केंद्र सरकारने 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात थेट 70 ते 71.50 रुपयांपर्यंत घसघशीत वाढ केली आहे. या दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

‘1 तारीख आली की मनात धडकी भरते…’; LPG सिलेंडरच्या दरात वाढ होताच रोहिणी खडसेंचं खोचक ट्विट
महागाईवरून रोहिणी खडसेंचा सरकारवर निशाणा

Rohini Khadse On LPG Cylinder Price: ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा मोठा झटका बसल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. केंद्र सरकारने 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात थेट 70 ते 71.50 रुपयांपर्यंत घसघशीत वाढ केली आहे. या दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. “हल्ली महिन्याची 1 तारीख आली की मनात धडकी भरते, सरकार कुठल्या बाजूने जनतेवर सर्जिकल स्ट्राईक करेल सांगता येत नाही,” अशा शब्दांत रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

9 महिन्यांत तब्बल 1500 रुपयांची दरवाढ

रोहिणी खडसे यांनी आपल्या पोस्टमध्ये आकडेवारी मांडत म्हटले आहे की, वर्षाच्या सुरुवातीला जे व्यावसायिक सिलेंडर 1684 रुपयांना उपलब्ध होते, त्याची किंमत आता 2954 रुपयांच्या आसपास पोहोचली आहे. अवघ्या 9 महिन्यांच्या कालावधीत व्यावसायिक गॅसच्या दरात जवळपास 1500 रुपयांची प्रचंड वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे हॉटेल, कँटीन, ढाबे आणि खानावळींमधील जेवणाचे दर वाढणार असून, याचा अंतिम फटका नोकरदार आणि सामान्य नागरिकांच्या खिशालाच बसणार आहे. “सामान्य माणसाने यातही नाराज न होता आपला जीडीपी 7.8 टक्क्यांनी वाढला यातच आनंद मानायचा,” असा उपरोधिक टोलाही त्यांनी सरकारला लगावला आहे.

सणासुदीच्या तोंडावर व्यावसायिक गॅस भडकला; घरगुती ग्राहकांना दिलासा

जागतिक पातळीवरील तणाव आणि इंधनाच्या पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडचणींमुळे ही दरवाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. नवीन दरवाढीनुसार व्यावसायिक सिलेंडर दिल्लीत 2810 रुपये, मुंबईत 2764 रुपये, चेन्नईत 2983 रुपये तर पाटण्यात 3100.50 रुपयांवर पोहोचला आहे.

हेही वाचा – विरोधाची वज्रमूठ! CJP सह ठाकरे बंधूंच्या मोर्चाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा; सुप्रिया सुळेंची मोठी घोषणा

सणासुदीचे दिवस जवळ आले असतानाच हॉटेल व्यावसायिक, केटरर्स आणि छोट्या व्यापाऱ्यांवर खर्चाचा अतिरिक्त ताण पडणार आहे. दरम्यान, 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. घरगुती गॅसचे दर दिल्लीत 942 रुपये, मुंबईत 941.50 रुपये आणि चेन्नईत 957.50 रुपये असे पूर्ववत ठेवण्यात आल्याने गृहिणींना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number