Rohit Pawar Protest: रोहित पवारांचे रास्ता रोको आंदोलन स्थगित; मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे, पण…

या आंदोलनादरम्यान केंब्रिज चौकात शेतकरी आणि नेत्यांनी एकत्र येत रास्ता रोको केला, ज्यामुळे वाहतूक काही काळ विसकळीत झाली होती.

Rohit Pawar Protest: रोहित पवारांचे रास्ता रोको आंदोलन स्थगित; मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे, पण…

Rohit Pawar Protest : छत्रपती संभाजीनगर येथील केंब्रिज चौक परिसरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेले भव्य आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी या ठिकाणी एकत्र येत सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते.

या आंदोलनादरम्यान केंब्रिज चौकात शेतकरी आणि नेत्यांनी एकत्र येत रास्ता रोको केला, ज्यामुळे वाहतूक काही काळ विसकळीत झाली होती. आंदोलन तीव्र होत असल्याचे पाहून राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी थेट आमदार रोहित पवार यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. मुख्यमंत्री स्वतः या विषयावर चर्चा करण्यास सकारात्मक असून सर्व प्रश्नांवर मार्ग काढला जाईल, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजन यांच्यामार्फत रोहित पवारांना दिला.

हेही वाचा – Yavatmal SUBT : ठाकरेंच्या दौऱ्याला 24 तासही उलटत नाहीत, तोच राजकीय भूकंप! 15 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

सरकारसोबत उद्या महत्त्वाची बैठक
मुख्यमंत्र्यांकडून चर्चेचे निमंत्रण आणि मिळालेल्या आश्वासनानंतर आमदार रोहित पवार यांनी आपले रास्ता रोको आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. सरकारच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे आंदोलनकर्त्यांनी तूर्तास नरमाईची भूमिका घेतली आहे.

आंदोलकांचा सरकारला इशारा
आंदोलन मागे घेतल्यानंतर बोलताना आमदार रोहित पवार यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांसोबत उद्या या विषयावर सविस्तर चर्चा होणार आहे. मात्र, जर पुन्हा एकदा सरकारने आम्हाला केवळ आश्वासने देऊन फसवले, तर यापेक्षाही मोठे आणि तीव्र आंदोलन उभारले जाईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number