Rohit Pawar : ‘हा अहवाल किती गांभीर्याने बनवला…’; रोहित पवार यांची DGCA च्या अहवालावर पहिली प्रतिक्रिया

मुंबई : दिवंगत अजित पवार यांच्या मृत्यूबाबत सखोल तपास व्हावा यासाठी, त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार हे गेल्या काही दिवसांपासून पाठपुरावा करत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर काही दिवसांनी रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत विमान अपघातातील काही प्रमुख मुद्दे मांडले होते. यावेळी त्यांनी वीएसआर विमान कंपनीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच अनेक […]

Rohit Pawar : ‘हा अहवाल किती गांभीर्याने बनवला…’; रोहित पवार यांची DGCA च्या अहवालावर पहिली प्रतिक्रिया

मुंबई : दिवंगत अजित पवार यांच्या मृत्यूबाबत सखोल तपास व्हावा यासाठी, त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार हे गेल्या काही दिवसांपासून पाठपुरावा करत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर काही दिवसांनी रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत विमान अपघातातील काही प्रमुख मुद्दे मांडले होते. यावेळी त्यांनी वीएसआर विमान कंपनीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच अनेक पुरावे सादर केले होते. त्यानंतर आज नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) आपला पहिला अहवाल जारी केला आहे. यावर रोहित पवार यांनीही एक्स पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच येत्या सोमवारी, 2 मार्च रोजी या विषयावर सविस्तर बोलणा असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

काय म्हणाले रोहित पवार एक्स पोस्टमध्ये, 

प्राथमिक अहवालात AAIB ने कोणता प्राथमिक निष्कर्ष काढला? CID या अहवालाचा आधार घेऊन कसा तपास करणार आहे? 

या अहवालातील पान क्रमांक ४ वरील मुद्दा ५.१ मधील “Baramati Airfiled is situated in the Baramati District of the state  Maharashtra” हे वाक्य AAIB ने हा अहवाल किती गांभीर्याने बनवला हे दाखवण्यासाठी पुरेसं आहे. परवा मुंबईत यावर विस्तृत बोलेल.

हेही वाचा : Ajit Pawar Plane Crash: धुकं, झाड आणि तांत्रिक बिघाड? DGCA च्या अहवालातील अजितदादांच्या विमान अपघातामागील ‘ही’ तीन मोठी कारणं समोर

अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज, 28 फेब्रुवारी रोजी एक महिना पूर्ण झाला असून, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या प्रकरणाचा 22 पानांचा प्राथमिक तपास अहवाल जारी केला आहे. या अहवालातून अपघाताच्या वेळची परिस्थिती आणि तांत्रिक बाबींबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

अहवालातील 5 मुख्य निष्कर्ष –

1. झाडाला पहिली धडक: विमान जमिनीवर कोसळण्यापूर्वी ते एका मोठ्या झाडावर आदळले होते. त्यानंतर विमानाने नियंत्रण गमावले आणि ते जमिनीवर कोसळले.
2. कमी दृश्यमानता (Low Visibility): बारामती विमानतळावर लँडिंगसाठी किमान 5000 मीटर दृश्यमानता आवश्यक असताना, अपघातावेळी ती केवळ 2000 ते 3000 मीटर इतकीच होती. धुक्यामुळे वैमानिकांना धावपट्टीचा अंदाज घेण्यात अडचण आली असावी, असा अंदाज आहे.
3. FDR आणि CVR डॅमेज: अपघातानंतर लागलेल्या भीषण आगीमुळे ‘फ्लाईट डेटा रेकॉर्डर’ (FDR) उष्णतेने खराब झाला आहे. कॉकपीटमधील संभाषणाचा डेटा (CVR) सुरक्षितपणे काढण्यासाठी आता अमेरिकेतील तज्ज्ञ कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे.
4. धावपट्टीच्या त्रुटी: बारामतीचे एअरफिल्ड ‘अनकंट्रोल्ड’ श्रेणीत येते. तेथील रनवे मार्किंग फिकट असणे आणि ‘टेबल-टॉप’ रनवे असणे हे घटकही अपघाताला कारणीभूत ठरल्याची शक्यता अहवालात वर्तवण्यात आली आहे.
5. वैमानिकाचा शेवटचा संदेश: विमान कोसळण्यापूर्वी वैमानिकाने रेडिओवर अत्यंत भीतीदायक शेवटचा संदेश दिला होता, ज्यातून अचानक नियंत्रण सुटल्याचे संकेत मिळतात. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number