Saturday, June 06, 2026 09:40:08 AM

Rohit Pawar: ‘मी महायुतीचा नाही, अजितदादांसाठी आणि सुनेत्रा काकींसाठी प्रचार केला’; रोहित पवार यांनी स्पष्टच सांगितलं

या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून, काल 21 एप्रिल 2026 रोजी प्रचाराची सांगता सभा मोठ्या उत्साहात पार पडली.

rohit pawar ‘मी महायुतीचा नाही अजितदादांसाठी आणि सुनेत्रा काकींसाठी प्रचार केला’ रोहित पवार यांनी  स्पष्टच सांगितलं

बारामती: राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया होत आहे. दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातामधील निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होत असून, महायुतीकडून सुनेत्रा पवार या अधिकृत उमेदवार आहेत. या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून, काल 21 एप्रिल 2026 रोजी प्रचाराची सांगता सभा मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेला मुख्यमंत्री आणि महायुतीतील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी बारामतीतील प्रचाराबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. आपण महायुतीचा प्रचार केला नसून, केवळ अजितदादा यांच्याविषयी असलेल्या आदरापोटी आणि सुनेत्रा काकींसाठी प्रचार केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रोहित पवार म्हणाले की, “मी दादांसाठी आणि सुनेत्रा काकींसाठी प्रचार केला आहे, महायुतीसाठी नाही.” त्यांनी पुढे सांगितले की, सुप्रिया सुळे यांनीही महायुतीचा प्रचार केला नाही, तर अजितदादांवरील प्रेम आणि सुनेत्रा पवारांविषयी असलेल्या आपुलकीपोटी त्या प्रचारात सहभागी झाल्या.

हेही वाचा: BEST New Buses: मुंबईकरांचा प्रवास सुखाचा होणार; ताफ्यात 500 नव्या बेस्ट बसेस, प्रशासनाची मोठी घोषणा

रोहित पवार यांनी दावा केला की, गेल्या तीन दिवसांत त्यांनी 60 ते 70 गावांमध्ये जाऊन प्रचार केला. या दौऱ्यात लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, बहुतांश ठिकाणी मतदारांचा कल सुनेत्रा पवारांकडे असल्याचे त्यांना जाणवले. त्यामुळे सुनेत्रा पवार या निश्चितपणे निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अजितदादा यांनी बारामतीमध्ये केलेली विकासकामे आणि सुनेत्रा पवार यांच्याविषयी असलेला आदर, यामुळे बारामतीकर त्यांनाच साथ देतील, असेही रोहित पवार म्हणाले. त्यामुळे बारामती पोटनिवडणुकीत आता भावनिक लाट आणि विकासकामांचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.  

हेही वाचा: Stock Market Today: शेअर बाजारात सलग होणाऱ्या तेजीला ब्रेक, सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात, 'या' बड्या शेअर्सनी गुंतवणूदारांना रडवलं


सम्बन्धित सामग्री