Sunetra Pawar: रुपाली चाकणकरांचा बनाव फसला; सुनेत्रा पवारांनी राजीनाम्याचं खरं कारण सांगून एका वाक्यात विषयच संपवला

अशोक खरात याच्या भक्तीत तल्लीन होणे राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना चांगलेच महागात पडले आहे.

Sunetra Pawar: रुपाली चाकणकरांचा बनाव फसला; सुनेत्रा पवारांनी राजीनाम्याचं खरं कारण सांगून एका वाक्यात विषयच संपवला

Sunetra Pawar: नाशिकचा वादग्रस्त 'कॅप्टन' अशोक खरात याच्या भक्तीत तल्लीन होणे राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना चांगलेच महागात पडले आहे. खरातची पाद्यपूजा करणे आणि त्याला 'गुरूमाऊली' मानणे या कृतींमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. विरोधकांसह सत्ताधारी पक्षातूनही टीकेचे आसूड ओढले गेल्याने महायुती सरकारची मोठी नाचक्की झाली. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'वर्षा' निवासस्थानी बोलावून स्पष्ट शब्दांत राजीनामा देण्याचे आदेश दिल्यानंतर, चाकणकर यांनी 'वैयक्तिक कारणास्तव' आणि 'स्वेच्छेने' पद सोडत असल्याचे भासवले. मात्र, हा केवळ एक राजकीय बनाव असल्याचे आता उघड होत आहे.

सुनेत्रा पवारांनी 'सत्य' आणले चव्हाट्यावर
रुपाली चाकणकर यांनी आपला राजीनामा 'स्वेच्छेने' दिल्याचे पत्रात नमूद केले असले तरी, राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मात्र वस्तुस्थिती जाहीर केली आहे. सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले की, सध्या सुरू असलेली चौकशी आणि निर्माण झालेली परिस्थिती पाहता चाकणकर यांना पद सोडावे लागले आहे. पवारांच्या या थेट विधानामुळे चाकणकर यांचा 'स्वेच्छा' राजीनाम्याचा दावा फोल ठरला असून, त्यांना राजकीय वर्तुळात तोंडघशी पडावे लागले आहे. चौकशी पारदर्शक व्हावी यासाठीच हा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विरोधकांचे प्रश्न आणि चौकशीचा ससेमिरा
या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरे यांनी जोरदार प्रहार केला आहे. राजीनाम्याचे खरे कारण जनतेला का सांगितले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अशोक खरात याच्यासोबतची छायाचित्रे आणि व्हिडिओ समोर आल्याने महिला आयोगाच्या प्रतिमेला तडा गेला होता. भोंदूबाबाच्या आहारी गेलेला आयोग, अशी टीका होत असताना, मुख्यमंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय चाकणकरांच्या राजकीय कारकिर्दीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

हेही वाचा – Ambadas Danve : रुपाली चाकणकरांनी केलेलं 'ते' कृत्य म्हणजे महापाप! अंबादास दानवे यांचा हल्लाबोल; राष्ट्रवादीकडे केली मोठी मागणी

राजीनामा पत्रातील 'सावध' पवित्रा
चाकणकर यांनी आपल्या अधिकृत पत्रात केवळ वैयक्तिक कारणांचा हवाला दिला असला, तरी त्यामागील मूळ कारण 'अशोक खरात चौकशी' हेच असल्याचे आता शिक्कामोर्तब झाले आहे. "आजवर दाखवलेल्या विश्वासासाठी मी ऋणी आहे," असे म्हणत त्यांनी आपली बाजू सावरून धरण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुनेत्रा पवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेल्या स्पष्टीकरणामुळे चाकणकर यांच्या 'मुरलेल्या राजकारणी' प्रतिमेला छेद गेला असून, सद्यस्थितीत त्या पूर्णपणे बॅकफूटवर आल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number