Sahar Shaikh: सहर शेख यांचं नगरसेविका पद धोक्यात? गाझियाबादच्या रहिवासी, शासनाची फसवणूक, बनावट जात प्रमाणपत्र…; नेमकं प्रकरण काय?

एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्यावर बनावट जात प्रमाणपत्राचा आरोप झाला आहे.

Sahar Shaikh: सहर शेख यांचं नगरसेविका पद धोक्यात? गाझियाबादच्या रहिवासी, शासनाची फसवणूक, बनावट जात प्रमाणपत्र…; नेमकं प्रकरण काय?

ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर चर्चेत आलेल्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. निवडणुकीदरम्यान त्यांच्या ‘कैसा हराया’ या डायलॉगने राज्यभरात लक्ष वेधले होते. मात्र आता त्यांच्यावर बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे त्यांच्या नगरसेवक पदावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे.

नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सहर शेख यांनी अधिकाऱ्यांची दिशाभूल करत जात प्रमाणपत्र मिळवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदाराने असा आरोप केला आहे की, आवश्यक नियम न पाळता आणि चुकीची कागदपत्रे सादर करून हा दाखला मिळवण्यात आला. या पार्श्वभूमीवर संबंधित कागदपत्रांची सखोल तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नियमांना बगल देत दाखला मिळवला?
तक्रारीनुसार, स्थलांतरित नागरिकांसाठी लागू असलेल्या प्रक्रियेऐवजी वेगळ्या नमुन्याचा वापर करून प्रशासनाची दिशाभूल करण्यात आली. या प्रक्रियेद्वारे मिळालेल्या दाखल्याच्या आधारेच सहर शेख यांनी निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला. मात्र आता या प्रमाणपत्राच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

चौकशीदरम्यान त्रुटी आढळल्या
या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना संबंधित अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज अधिकच अधोरेखित झाली आहे. तक्रारदाराने या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे.

सहर शेख कोण आहेत?
सहर शेख या ठाणे महानगरपालिकेतील एमआयएमच्या नगरसेविका आहेत. जानेवारी 2026 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 मधून विजय मिळवला होता. निवडणुकीदरम्यान त्यांच्या वक्तव्यांमुळे त्या चर्चेत आल्या होत्या.

सध्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून पुढील काही दिवसांत अधिक स्पष्ट माहिती समोर येण्याची शक्यता आहे. जर आरोप सिद्ध झाले, तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number