‘लाठ्या-काठ्या झेलण्यास मी पुढे…’; पुण्यात MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात संजय राऊत कडाडले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी बोलताना त्यांनी राज्य सरकार, एमपीएससी प्रशासन आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला.
‘लाठ्या-काठ्या झेलण्यास मी पुढे…’; पुण्यात MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात संजय राऊत कडाडले
Sanjay Raut

MPSC Agitation Pune: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध मागण्यांसाठी पुण्यात रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता राजकीय पाठिंबा मिळू लागला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी बोलताना त्यांनी राज्य सरकार, एमपीएससी प्रशासन आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तरुणांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, हे आंदोलन म्हणजे महाराष्ट्राचे ‘जंतर मंतर’ बनले आहे, असे ते म्हणाले. तरुणांच्या संघर्षात कोणतीही फूट पडू न देता वरपासून खालपर्यंत संपूर्ण प्रशासनाचे शुद्धीकरण होईपर्यंत लढा सुरूच राहील, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्याची मागणी अन् आदित्य ठाकरे आंदोलनात सहभागी होणार

आपल्या भाषणात संजय राऊत यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर पुन्हा एकदा तीव्र निशाणा साधला. भ्रष्ट मार्गाने सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना पदावरून दूर करावेच लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्या White-Collar माफियांना राज्य सरकार पाठिशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या या न्याय्य हक्काच्या लढ्याला पाठबळ देण्यासाठी येत्या काळात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे स्वतः आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. 1000 किंवा 10000 विद्यार्थी जेव्हा आपल्या हक्कासाठी एकत्र येतात, तेव्हा कोणतीही हुकूमशाही टिकू शकत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – नागपूर मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी? उमेदवार जाहीर करताच फडणवीसांची डोकेदुखी वाढली; नेमकं कारण काय?

‘संघर्षाला भगवा सलाम’; देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

राज्यातील तरुणांना आणि शोषित घटकांना पुढे जाऊ न देण्याचा डाव सत्ताधाऱ्यांकडून रचला जात असल्याचे सांगत, महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या विचारांचा आहे हे विसरू नका, असा इशारा राऊत यांनी दिला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून बहिरेपणाचे सोंग घेतले आहे. परंतु, जर हे आंदोलन राज्यभर पसरले, तर सत्ताधाऱ्यांना रस्त्यावर फिरणे कठीण होईल. विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी आणि लाठ्या-काठ्या झेलण्यासाठी मी स्वतः सर्वात पुढे असेन, असे सांगत त्यांनी उपस्थित हजारो विद्यार्थ्यांना ‘भगवा सलाम’ करत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version