दुर्दैवी घटना! ठाणे गुन्हेगारांचं आश्रयस्थान…; संजय राऊतांची प्रदीप पूर्णेकरांच्या मृत्यूप्रकरणी प्रतिक्रिया, म्हणाले ‘खरे गुन्हेगार शिंदे गटाचे…’

ठाणे हे गेल्या काही काळापासून गुन्हेगारांचा अड्डा आणि आश्रयस्थान बनलं आहे. या राज्याच्या गृहमंत्र्यांचा कारभार लज्जास्पद आहे.
sanjay raut and pradeep purnekar
sanjay raut and pradeep purnekar

ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांची ठाण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून ही अत्यंत दुर्देवी घटना असल्याचे म्हटले आहे. तसेच प्रदीप पूर्णेकर हे ठाण्यातील निष्ठावंत शिवसैनिक होते. त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ठाणे हे गेल्या काही काळापासून गुन्हेगारांचा अड्डा आणि आश्रयस्थान बनलं आहे. या राज्याच्या गृहमंत्र्यांचा कारभार लज्जास्पद आहे. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही राऊतांनी केली आहे. शिवाय पूर्णेकरांना ज्यांनी गोळ्या घातल्या त्यांचे सूत्रधार शिंदे गटात आहेत, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.

हेही वाचा : Exclusive: दोन वर्षांपूर्वीच रचला कट…गणेशोत्सवापासून प्लॅनिंग सुरू…कॉलद्वारे संपवण्याची भाषा…; प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा खळबळजनक दावा

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, या राज्याच्या गृहमंत्र्यांचा कारभार लज्जास्पद आहे. त्यांना प्रश्न केला तर ते मागच्या 10 वर्षापूर्वीचे आकडे देतील. ठाण्यात एका महिन्यात पाच लोकांच्या हत्या झाल्या आहेत. 25 सप्टेंबर रोजी किसन भोईर नावाच्या पोलीस अधिकाऱ्याची हत्या झाली. गस्तीवर असताना वागळे इस्टेट येथे ही हत्या झाली. काल पूर्णेकरांची हत्या झाली. हत्यांची मालिका सुरू आहे. काय करत आहे गृहखातं? काय करत आहेत ठाण्याचे पोलीस आयुक्त? पोलीस आयुक्त मंत्र्यांचे घरगडी आहेत का? ठाण्यात गृहखात्याची रेंज पोहोचत नाही का? असा सवाल संजत राऊत यांनी केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version