‘धनुष्यबाण पुन्हा योग्य हातातच येणार…’; सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

'धनुष्यबाण' या निवडणूक चिन्हावरून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी केलेल्या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
‘धनुष्यबाण पुन्हा योग्य हातातच येणार…’; सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Sanjay Raut reaction on Supreme Court

Shiv Sena symbol case: शिवसेना नाव आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावरून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी केलेल्या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सुनावणी दरम्यान न्यायालयाने ‘घटनात्मक पाप करणाऱ्यांना पक्षाचे चिन्ह मिळणार की त्याविरोधात तक्रार करणाऱ्यांना?’ असा रोखठोक सवाल शिंदे गटाच्या वकिलांना विचारला होता. यावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, न्यायालयाचे हे निरीक्षण अत्यंत गंभीर आणि योग्य दिशेने जाणारे आहे. त्यामुळे मूळ शिवसेना आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह पुन्हा योग्य ठिकाणीच येईल, असा ठाम विश्वास त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

‘फुटीरांना संरक्षण कसे मिळू शकते?’ न्यायालयाच्या निरीक्षणावर ठाकरे गटाची भूमिका

माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी सांगितले की, ज्यांनी पक्षाशी आणि घटनेशी द्रोह केला आहे, त्यांना पक्षाचे नाव अथवा चिन्ह देणे चुकीचे आहे. तक्रारदाराची बाजू ऐकून न घेता ज्यांच्याविरोधात तक्रार केली आहे, त्यांनाच घटनात्मक संरक्षण दिले जात असल्याबद्दल न्यायालयाने उपस्थित केलेले प्रश्न अत्यंत रास्त आहेत. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी पारदर्शक आणि योग्य न्याय होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पक्षाची ओळख आणि स्वाभिमान टिकवण्यासाठी कायदेशीर लढाई योग्य मार्गाने सुरू असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

हेही वाचा – ‘गोकुळ’च्या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांसमोर बंडखोरी थोपवण्याचे मोठे आव्हान; ऐनवेळी कोण दगा देणार? इच्छुकांची प्रचंड गर्दी अन्..

आदिवासी व MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राज्य सरकारवर कडक टीका

दुसरीकडे, नाशिकहून आपल्या मागण्यांसाठी मुंबईत आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. “विद्यार्थी टिळक भवनात थांबले म्हणून त्यांना तिथून फरफटत बाहेर काढण्यात आले. जर सरकारला ते खटकत होते, तर त्यांची व्यवस्था शासकीय अतिथीगृहात का केली नाही?” असा सवाल त्यांनी केला. तसेच, पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा उल्लेख करत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष आंदोलकांच्या जागी जाऊन त्यांच्याशी थेट संवाद साधायला हवा, असा सल्लाही त्यांनी दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version