Maharashtra politics: ‘भारतीय युवक मंद…’; संजय राऊतांच्या पोस्टने राजकारण तापलं, भाजपाचा जोरदार पलटवार

संजय राऊत यांनी भारतीय युवकांबाबत केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

Maharashtra politics: ‘भारतीय युवक मंद…’; संजय राऊतांच्या पोस्टने राजकारण तापलं, भाजपाचा जोरदार पलटवार

संजय राऊत यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय युवकांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राऊत यांच्यावर विविध स्तरातून टीका होत असून भाजपानेही या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. राऊत यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये भारतीय युवक भरकटलेले आणि मंद झाल्याचा उल्लेख केला होता. या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये रशियन क्रांतिकारक व्लादिमीर लेनिन यांचे एक वाक्य शेअर केले. ‘एखादे राष्ट्र संपवायचे असेल, तर त्या देशातील युवकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करा,’ असे वाक्य पोस्ट करत त्यांनी सध्याच्या भारतीय युवकांबाबत टिप्पणी केली. त्यानंतर कंसात ‘सध्या भारतीय युवक भरकटलेला आणि मंद झालाय’ असे लिहित “जय श्रीराम” असा उल्लेखही केला होता. या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले.

राऊत यांच्या वक्तव्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. भाजपाचे नेते नवनाथ बन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राऊत यांच्यावर निशाणा साधला. ‘भारतीय युवकांना मंद म्हणण्यापूर्वी त्यांचे कर्तृत्व पाहावे,’ असे म्हणत त्यांनी राऊत यांच्या विधानाचा समाचार घेतला.

नवनाथ बन यांनी आपल्या प्रतिक्रियेत भारतीय युवक स्टार्टअप उभारत आहेत, विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत, सीमेवर देशाचे रक्षण करत आहेत आणि मतदानातून लोकशाही मजबूत करत आहेत, असे नमूद केले. युवक भरकटलेले नसून नकारात्मक राजकारणाला त्यांनी नाकारल्याचा टोला त्यांनी लगावला.

तसेच “जय श्रीराम”च्या घोषणेमुळे युवक भरकटले असे म्हणणे चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भारतात रामाचा जयघोष हजारो वर्षांपासून सुरू असल्याचे सांगत त्यांनी राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. सोशल मीडियावरील या शब्दयुद्धामुळे राजकीय वातावरण अधिकच तापल्याचे चित्र आहे.

राऊत यांच्या वक्तव्यावर इतर राजकीय नेतेही प्रतिक्रिया देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावरही या पोस्टवर समर्थन आणि विरोध अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी राऊत यांच्यावर भारतीय युवकांचा अपमान केल्याचा आरोप केला, तर काहींनी त्यांच्या विधानामागील राजकीय संदर्भ समजून घेण्याची गरज असल्याचे म्हटले.

राज्यात आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता असून, सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number