ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्च्यात लाखोंच्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात मुंबईतील मेट्रो सिनेमा ते मुंबई महानगरपालिका मुख्यालयपर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्च्यात महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सामील होणार आहेत. यावेळी संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
काय म्हणाले संजय राऊत?
लोकशाही रक्षणाचं मोठ आंदोलन –
‘मुख्य निवणूक आयोग ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात देशभरात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत, याचे पडसाद आता मुंबईत देखील पाहायला मिळत आहेत. त्यामुळे भविष्यात देशातील
संविधानाला व लोकशाहीला वाचवण्याचं केंद्र दिल्ली नंतर मुंबई देखील ठरणार आहे. कारण कालचे CJP च आंदोलन देखील मुंबईत झाले होते’.अशी सुरुवात करत नागरिकांना मोठ्या संख्येने या मोर्च्यात सहभागी होण्यास आवाहन दिले
भाजपा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या मदतीने जिंकून येतात-
‘भाजपाच्या दाव्यावर ज्ञानेश कुमार चालतात, देश चालत नाही आणि त्या ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठी हे आंदोलन आहे. भाजपाच्यावतीने ज्ञानेश सगळं काही करतो, ज्ञानेश हा भाजपाचा BLO आहे, तोच त्यांचा इलेक्शन एजन्ट आहे. भारतीय जनता पक्ष व त्यांचे मित्र पक्ष हे ज्ञानेश सारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मदतीने जिंकतायत’ असं म्हणत भाजपाला अप्रत्यक्षरीत्या टोला लगावला.
आम्ही भाजपा विरोधात नाही; पण..
‘हे बंड ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात असून भाजपा विरोधात नाही. मात्र भाजपाने इलेक्शन कमिशनची वकिली करू नये, ती भ्रष्ट्राचाराची आणि देशद्रोहाची वकिली ठरेल. जनमताच्या रेट्यापुढे भले भले हुकूमशहा अदृश्य झाले, मरण पावले, मारले गेले तर ज्ञानेश कुमार कोण’?
जर ज्ञानू गेला नाही तर नरुभाऊ जाईल-
‘हा गर्जना मोर्चा म्हणजे ठिणगी पडण्याची सुरवात आहे, आता वणवा पेटणार आणि ज्ञानेश कुमारला राजीनामा द्यावा लागणार. ज्ञानेश कुमार काय तर देशातल्या प्रमुख राज्यकर्त्यांना या वणव्यामध्ये बळी पडावं लागेल’
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.