Saturday, December 06, 2025 10:45:16 AM

BJP vs Shivsena : सेना-भाजप वाद शिगेला! सुरुवात शिवसेनेने केली, आता तक्रार कशाला? फडणवीसांची थेट शिंदे गटाच्या मंत्र्यांना उत्तर

दोन-तीन पक्षांच्या सरकारमध्ये वेगवेगळ्या मुद्यांवर मतभेद होणे सामान्य असले तरी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे मतभेद आता अधिक तीव्र झाले आहेत.

bjp vs shivsena  सेना-भाजप वाद शिगेला सुरुवात शिवसेनेने केली आता तक्रार कशाला फडणवीसांची थेट शिंदे गटाच्या मंत्र्यांना उत्तर

BJP vs Shivsena : राज्यात महायुतीचं सरकार आहे. यात भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश आहे. दोन-तीन पक्षांच्या सरकारमध्ये वेगवेगळ्या मुद्यांवर मतभेद होणे सामान्य असले तरी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे मतभेद आता अधिक तीव्र झाले आहेत. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या गटातील अनेक मंत्री अनुपस्थित राहिले. त्यांनी मंत्रीमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकून आपली नाराजी व्यक्त केली. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकटेच बैठकीत उपस्थित होते.

शिंदे गटातील नाराजीचे कारण

शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रीमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकण्यामागे मुख्य कारण म्हणजे भाजपने शिवसेनेच्या काही माजी पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. डोंबिवलीत माजी नगरसेवकाचा भाजपात प्रवेश झाल्यानंतर शिंदे गटातील मंत्री अस्वस्थ झाले आहेत. त्याचबरोबर, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये सामील करण्याच्या कामात रविंद्र चव्हाण यांचा हात असल्याची तक्रारही मंत्र्यांनी यावेळी केली.

हेही वाचा - हेही वाचा- Ambadas Danve Vs Eknath Shinde: "मित्रपक्षात पळवापळवी सुरु आहे" महायुतीतील अंतर्गत कुरकोडींवरुन दानवेंचा शिंदेंना खोटक टोला

मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

दरम्यान, आता या सर्वांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केली, तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचे, आणि भाजपाने केले तर चालणार नाही असे होणार नाही. आता एकमेकांना प्रवेश देण्याचे काम थांबवावे. दोन्ही पक्षांनी नियम पाळावेत,' असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

हेही वाचा - Cabinet Meeting: शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये मतभेद? मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेनेच्या मंत्र्यांची गैरहजेरी

भाजपमध्ये पक्षप्रवेश आणि शिंदे गटातील अस्वस्थता

अलीकडेच ठाणे, कल्याण, अंबरनाथसह राज्यभरात अनेक महत्त्वाच्या ठिकाणी शिंदे गटातील पदाधिकारी भाजपात प्रवेश करत आहेत. या इनकमिंगमुळे शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये नाराजी वाढली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षविस्तार शिंदे गटासाठी मोठा धोकादायक घटक मानला जात आहे. या घटनांमुळे महायुती सरकारच्या स्थैर्यावर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.  
 


सम्बन्धित सामग्री