पतीमुळे काँग्रेसच्या केंद्रीय मंत्र्याची कन्या भाजपमध्ये आली; दोनदा खासदारही झाली अन् नातं बिघडलं.. अखेर घटस्फोटाची वेळ

हिमाद्री सिंह या मध्य प्रदेशातील एका बड्या आणि अत्यंत प्रभावशाली आदिवासी राजकीय कुटुंबातून येतात. ते आणि त्यांचे पती अनेक वर्षांपासून वेगळे राहत होते.

पतीमुळे काँग्रेसच्या केंद्रीय मंत्र्याची कन्या भाजपमध्ये आली; दोनदा खासदारही झाली अन् नातं बिघडलं.. अखेर घटस्फोटाची वेळ

Shahdol MP Himadri Singh Divorce 2026: मध्य प्रदेशातील शहडोल लोकसभा मतदारसंघाच्या दोन वेळच्या भाजप खासदार हिमाद्री सिंह यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हिमाद्री सिंह यांनी आपले पती आणि भाजप नेते नरेंद्र सिंह मरावी यांच्यापासून घटस्फोट घेतला आहे. 23 नोव्हेंबर 2017 रोजी अनुपपूर जिल्ह्यातील पुष्पराजगढ येथे या दोघांचा विवाह पार पडला होता. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघे एकमेकांपासून वेगळे राहत होते. या दाम्पत्याला गिरिशा कुमारी सिंह ही मुलगी असून ती सध्या खासदार हिमाद्री सिंह यांच्याकडेच राहते.

काँग्रेसच्या राजकीय वारशातून भाजपच्या युवा खासदार होण्यापर्यंतचा प्रवास
हिमाद्री सिंह या मध्य प्रदेशातील एका बड्या आणि अत्यंत प्रभावशाली आदिवासी राजकीय कुटुंबातून येतात. त्यांचे वडील दिवंगत दलबीर सिंह हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मंत्रीमंडळात केंद्रीय मंत्री होते. तर त्यांच्या आई दिवंगत राजेश नंदिनी या कोतमा विधानसभेच्या आमदार तसेच शहडोलच्या खासदार राहिल्या आहेत. हिमाद्री सिंह यांनी 2016 साली प्रथम काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची पोटनिवडणूक लढवली होती. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2019 तसेच 2024 अशा दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवला. दिल्लीतून शिक्षण पूर्ण केलेल्या हिमाद्री यांनी नुकतेच उझबेकिस्तानमधील समरकंद येथे झालेल्या जागतिक युवा खासदार संमेलनात भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

हेही वाचा – Omraje Nimbalkar : '14 दिवस झाले, तुम्ही जरांगे पाटील यांना भेटायला का गेले नाही?'; जरांगेंच्या समर्थकाचा ओमराजेंना सवाल, ऑडिओ क्लिप व्हायरल

सासूविरोधात लढले निवडणूक; पत्नीला भाजपमध्ये आणण्यात मरावी यांची मुख्य भूमिका
हिमाद्री यांचे माजी पती नरेंद्र सिंह मरावी हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि भाजपच्या राजकारणात दीर्घकाळापासून सक्रिय आहेत. विशेष म्हणजे, 2009 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मरावी यांनी हिमाद्री यांच्या आई राजेश नंदिनी सिंह यांच्याविरोधात भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, ज्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. पुढे मध्य प्रदेश अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या नरेंद्र मरावी यांनीच हिमाद्री सिंह यांना काँग्रेसमधून भाजपमध्ये आणण्यात आणि 2019 मध्ये त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

पत्नीचे वाढते राजकीय वजन आणि घटस्फोटामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा
गेल्या काही वर्षांत भाजपच्या राजकारणात हिमाद्री सिंह यांचे राजकीय वजन आणि प्रभाव सातत्याने वाढत गेला, तर दुसरीकडे नरेंद्र मरावी यांचा पक्षातील प्रभाव कमी होत गेला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मरावी यांनीही भाजपमधून तिकिटासाठी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र, पक्षाने पुन्हा हिमाद्री सिंह यांच्यावरच विश्वास दाखवला. अनेक वर्षांचे वेगळे राहणे आणि अखेर झालेला घटस्फोट यामुळे सध्या मध्य प्रदेशातील आणि केंद्रीय राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा – Big News: राजकारणात मोठा भूकंप! NCPI चे ते 17 बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर; तोडफोड आणि पक्षाच्या कार्यालयाला आग

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number