Operation Tiger: पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर सावरलेल्या ठाकरेंच्या संसदेतील ताकदीला शिंदेंचा पुन्हा सुरुंग; ‘या’ 7 ‘संजय’ नावांनी केला घात

वर्ष 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड पुकारून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून खाली खेचले होते.

Operation Tiger: पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर सावरलेल्या ठाकरेंच्या संसदेतील ताकदीला शिंदेंचा पुन्हा सुरुंग; ‘या’ 7 ‘संजय’ नावांनी केला घात

Operation Tiger: महाराष्ट्राच्या राजकारणात अवघ्या 4 वर्षांच्या कालावधीत शिवसेनेला दुसऱ्यांदा मोठ्या फाटाफुटीचा सामना करावा लागला आहे. वर्ष 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड पुकारून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून खाली खेचले होते. त्यानंतर लोकसभेतील 13 खासदारांनीही शिंदे गटात प्रवेश केला, ज्यामुळे पक्ष आणि अधिकृत चिन्ह ठाकरेंच्या हातातून निसटले. या प्रचंड मोठ्या धक्क्यातून सावरत उद्धव ठाकरे यांनी वर्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आपल्या नव्या चिन्हावर 9 खासदार निवडून आणले होते. मात्र, आज त्यापैकी 6 खासदारांनी पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने ठाकरेंच्या अडचणीत कमालीची वाढ झाली आहे.

राजकीय संघर्षाच्या केंद्रस्थानी 'संजय' नावाची चर्चा

शिवसेनेच्या या संपूर्ण राजकीय प्रवासात आणि पडझडीत 'संजय' हे नाव सर्वाधिक चर्चेत राहिले आहे. वर्ष 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपशी युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तेव्हापासून ते आजपर्यंत राऊत हे सातत्याने भाजप आणि विरोधी गटावर प्रहार करत ठाकरेंची बाजू खंबीरपणे मांडत आहेत. वर्ष 2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे आपल्या समर्थकांसह आधी सुरत, मग गुवाहाटी आणि गोव्यामार्गे मुंबईत आले, तेव्हाही राऊत यांनी बंडखोरांविरोधी आक्रमक भूमिका घेत उद्धव ठाकरेंसाठी एकहाती किल्ला लढवला होता.

पहिल्या बंडात 'सामना'वीराच्या विरोधात उभे राहिले 4 संजय

एकीकडे पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत हे बंडखोरांना अंगावर घेत असताना, दुसरीकडे पक्षातील त्यांचेच अनेक नामसाधर्मी शिलेदार उद्धव ठाकरेंची साथ सोडत होते. वर्ष 2022 मध्ये झालेल्या पहिल्या भूकंपात 40 आमदारांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली, ज्यामध्ये तब्बल 4 आमदार 'संजय' नावाचे होते. छत्रपती संभाजीनगरचे संजय शिरसाट, बुलढाण्याचे संजय गायकवाड, दिग्रसचे संजय राठोड आणि मेहकरचे संजय रायमुलकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यामध्ये शिरसाट आणि गायकवाड यांनी तर थेट मातोश्री आणि संजय राऊत यांच्यावरच पलटवार करत शिवसेनेतील अंतर्गत संघर्षाला मोठी धार दिली होती.

हेही वाचा – Shivsena Operation Tiger : ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी! 19 तारखेला करणार महत्त्वाची घोषणा; काय आहे नवी अपडेट?

खासदारकीच्या दुसऱ्या गळतीत आणखी 3 संजय पक्षाबाहेर

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आज घडवून आणलेल्या दुसऱ्या मोठ्या राजकीय धक्क्याने ठाकरेंच्या संसदेतील ताकदीला मोठा सुरुंग लावला आहे. ठाकरे गटाच्या 9 खासदारांपैकी जे 6 खासदार शिंदे गटात सामील झाले, त्यामध्ये पुन्हा एकदा 3 'संजय' नावाच्या खासदारांचा समावेश आहे. परभणीचे संजय जाधव, ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील आणि यवतमाळ-वाशीमचे संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेसेनेत जाणे पसंत केले आहे. थोडक्यात सांगायचे तर, वर्ष 2022 पासून संजय राऊत हे उद्धव ठाकरेंसाठी राजकीय मैदानावर एकटे ढाल बनून लढत असताना, याच काळात त्यांच्याच पक्षातील इतर 7 'संजय' मात्र ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या गोटात दाखल झाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number